Babanrao Lonikar-Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Babanrao Lonikar-Raosaheb Danve : मी अन् रावसाहेब दानवेंनी ठरवलं तर जालना महापालिका ताब्यात घेऊ शकतो! लोणीकरांचा दावा..

Tensions and alliances within the BJP are in focus as Danve and Lonikar may join forces in Jalna : रावसाहेब दानवे आणि आपल्यामध्ये गेल्या सहा वर्षापासून वाद असल्याची कबुली दिली. पक्षाच्या चौकटीतले हे वाद आहेत. आम्ही दोघांनी ठरवलं तर जालना महापालिका ताब्यात घेऊ शकतो.

Jagdish Pansare

BJP Political News : जालना जिल्ह्याच्या राजकारणात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील पक्षातंर्गत वाद सर्वश्रुत आहेत. गेल्या काही वर्षापासून या दोन्ही नेत्यांनी संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न केले. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये दानवे-लोणीकर वर्चस्वाची लढाई दिसून आले.

कोणाची सरशी झाली हा वादाचा विषय असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या दोन्ही नेत्यांचे सूर जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दानवे-पिता पुत्रांच्या अनुपस्थितीत भाजप पक्ष कार्यालयात बबनराव लोणीकरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि आपल्यामध्ये गेल्या सहा वर्षापासून वाद असल्याची कबुली दिली. पक्षाच्या चौकटीतले हे वाद आहेत.

आम्ही दोघांनी ठरवलं तर जालना महापालिका ताब्यात घेऊ शकतो, असेही लोणीकर (Babanrao Lonikar) म्हणाले. तसेच गावपातळीवर दोघांच्या समर्थकांमध्ये असलेले वाद मिटवून टाकण्याचे आवाहन करत लोणीकर यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जाते.भारतीय जनता पक्षात बाहेरून प्रवेश करणाऱ्या म्हणजेच पाहुण्यांची संख्या वाढली आहे. अगदी राज्याच्या मंत्रिमंडळातही पाहुणे अधिक आहेत. पण सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी त्याची फारशी चिंता करू नये.

पाहुणे येत जात असतात पक्ष आपल्यालाच चालवायचा आहे, असेही लोणीकर यांनी सांगत कार्यकर्त्यांची समजूत काढली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्याला मित्र पक्षांशीच लढावे लागेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. जालना जिल्हा परिषदेत भाजपचे तीस सदस्य निवडून आले तर आपल्या कुणाच्या कुबड्यांची गरज पडणार नाही.

पण कदाचित यासाठी आपल्याला मित्र पक्षांशीच दोन हात करावे लागतील, असे सागंत लोणीकर यांनी स्वबळाची तयारी करण्याचे आवाहनही उपस्थित कार्यकर्त्यांना केले. एकूणच दानवे पिता पुत्रांच्या अनुपस्थित झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्यात बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला.

जालना जिल्ह्याच्या भाजप शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांनी आपापल्या समर्थकांच्या वर्णीसाठी जोर लावला होता. रावसाहेब दानवे यांनी शहराध्यक्ष पदावर भास्कर पाटील दानवे यांची वर्णी लावत बाजी मारली. पण जालना ग्रामीणसाठी दानवे यांनी ज्या नावाला पसंती दर्शवली होती त्याचा मात्र लोणीकर आणि आमदार आणि जिल्हाध्यक्ष असलेल्या नारायण कुचे यांनी करेक्ट कार्यक्रम केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT