Jalna Mahapalika News.jpg Sarkarnama
मराठवाडा

Jalna BJP News: ...अन् संतापलेल्या भाजपच्या सभापतींनी चक्क जालना महापालिकेच्या परिसरातच उभारला मंडप!

Marathwada Political News: मराठवाड्यातील जालना महापालिकेच्या स्थायी समिती सभापती मकरंद पांगारकर यांच्या या गांधीगिरीनंतर महापालिका आयुक्तांनी त्यांची भेट घेत लवकरच दालन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत त्यांना महानगरपालिकेच्या कार्यालयात नेले. सत्ताधारी पक्षाची ही अवस्था असेल तर मग विरोधी पक्षनेता किंवा इतर सभापतींना आपला कारभार कसा करावा लागेल? याचा अंदाज यावरून येत आहे.

Jagdish Pansare

Marathwada Politics : जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपनं बहुमतासह शत-प्रतिशत सत्ता मिळवली. महापौर व महापौर, स्थायी समितीसह सर्व विषय समित्यांची सभापती पदे भाजपकडेच आहे. परंतु महापालिकेत स्थायी समिती सभापती मकरंद पांगारकर यांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी दालनच उपलब्ध नसल्याने त्यांनी चक्क महापालिका परिसरात मंडप उभा करून कामकाजाला सुरुवात केली.

मराठवाड्यातील जालना महापालिकेच्या स्थायी समिती सभापती मकरंद पांगारकर यांच्या या गांधीगिरीनंतर महापालिका आयुक्तांनी त्यांची भेट घेत लवकरच दालन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत त्यांना महानगरपालिकेच्या कार्यालयात नेले. सत्ताधारी पक्षाची ही अवस्था असेल तर मग विरोधी पक्षनेता किंवा इतर सभापतींना आपला कारभार कसा करावा लागेल? याचा अंदाज यावरून येत आहे. महापालिकेच्या निवडणुकीआधी प्रशासकांच्या कार्यकाळात आयुक्तांच्या कार्यालयाचे नूतनीकरण करून ते चकचकीत करण्यात आले. परंतु सभापतींच्या कक्षाची मात्र दुरावस्था आहे.

सत्ताधारी पक्षाच्या सभापती व इतर पदाधिकाऱ्यांना दालन नसल्याने सभापती मकरंद पांगारकर यांनी सोमवारी महापालिका परिसरात चक्क मंडप उभा केला आणि तिथूनच आपल्या कारभाराला सुरुवात केली. रखरखत्या उन्हात दुपारपर्यंत ते मंडपातच बसून होते. अखेर याची माहिती आयुक्तांना झाल्यानंतर त्यांनी तातडीने मंडपात येऊन पांगारकर यांची समजूत काढली व लवकरच दालन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत त्यांना कार्यालयाच्या आत नेले.

महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. तेव्हाच खरं तर संभाव्य बदल करणे आवश्यक होते. प्रशासक आणि आयुक्त पदाचा पदभार एकाच व्यक्तीकडे असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महापालिकेचे पहिले आयुक्त संतोष खांडेकर लाचेच्या प्रकरणात अडकल्यानंतर या पदावरून गेले. त्यानंतर काही काळ जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याकडे प्रशासक आणि आयुक्तपदाचा पदभार होता.

त्या काळात आयुक्तांच्या कार्यालयावर लाखो रुपये खर्च करून ते प्रशस्त आणि चकचकीत करण्यात आले. मात्र निवडून आलेल्या प्रथम नागरिक महापौरांसाठी जुनेच नगराध्यक्षांचे दालन उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप आहे. तर उपमहापौरांनाही उपनगराध्यक्षांच्या जुन्या कक्षात असलेले सामान इतरत्र हलवून ते उघडून देण्यात आले आहे.

तर स्थायी समितीसह अन्य सहा सभापतींच्या कक्षाची व्यवस्था तात्पुरती करण्यात आली आहे. नव्या महापौर आणि उपमहापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता कुठे त्यांच्या दालनाची दुरूस्ती करण्यात आली. सभापतींना दालन उपलब्ध नसताना विरोधी पक्ष नेत्यांची ही तीच अवस्था आहे.

आयुक्त अंजली शर्मा यांनी सभापतींना बसण्यासाठी दालनाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असून, पुढील पंधरा दिवसांत दालनाचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, सभापतींना बसण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांनाही मनपात त्यांची भेट होत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे काम अपुरे असल्याने उपमहापौर व सभापतींच्या दालनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

उपमहापौर राजेश राऊत यांना स्वतंत्र दालन उपलब्ध नसल्यानं ते महापौरांच्या दालनात बसून कामकाज करत आहेत. तसेच स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर यांनाही दालन मिळालेले नाही. शिक्षण व विद्युत सभापती भाग्यश्री जोगस यांच्या दालनाचे काम सुरू आहे. त्यामुळे विविध कामांसाठी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना सभापतींची भेट न मिळाल्याने कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT