

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणातील सर्व आरोप फेटाळत कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
त्यांच्या भगिनीची पोलिसांकडून चौकशी झाली असून निनावी पत्रावरून वाद वाढला आहे.
आरोप हेतुपुरस्सर बदनामीसाठी केल्याचा दावा करत चाकणकर यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले.
Pune News : भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये रोज नवनवीन आरोप होताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे एसआयटीकडून कसून चौकशी होत असताना दुसरीकडे मात्र आरोप प्रत्यारोपांचा उडालेला धुरळा अद्यापही शमलेला नाही.
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रूपाली चाकण यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवित्याला धोका असल्याबाबतचा एक पत्र बीड येथून पोलिसांना देण्यात आला होते. त्यावर मोठ्या प्रमाणात उलट सुलट चर्चा झाल्या. त्यानंतर आता चाकणकर यांनी या सगळ्या प्रकरणावर मौन सोडत 28 दिवसांनी आता भाष्य केलं आहे.
या सगळ्या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले, त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत. हे वेळोवेळी समोर येत आहे. याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले.
तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले. हे घडवून आणण्यामागे कुणाचे 'सौजन्य' होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही, हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे .
तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले, कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे. यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. केवळ तर्कवितर्क, अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय. बदनाम केले जात आहे, हे अत्यंत खेदजनक आहे.
मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे. खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच, हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही, कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.
1. रुपाली चाकणकर कोणत्या प्रकरणामुळे चर्चेत आहेत?
अशोक खरात प्रकरणातील आरोपांमुळे त्या चर्चेत आहेत.
2. त्यांनी काय स्पष्टीकरण दिले?
आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
3. निनावी पत्राचा वाद काय आहे?
एक निनावी पत्र माध्यमांमध्ये आल्याने या प्रकरणाला अधिक वाचा फुटली.
4. त्यांच्या कुटुंबाची चौकशी झाली का?
होय, त्यांच्या भगिनीची पोलिसांनी चौकशी केली आहे.
5. पुढे काय होऊ शकते?
या प्रकरणात पुढील तपासानुसार सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.