Mumbai mayor beacon light row: मुंबईच्या महापौर रितू तावडेंना 'दिव्या'चा मोह नडला! उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांने साधला निशाणा !

BJP Mumbai municipal politics News :. महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरील निळे व लाल दिवे आणि नामफलक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Ritu Tawade
Ritu TawadeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने ठाकरे कुटुंबीयांच्या शिवसेनेची 25-30 वर्षांच्या सत्तेनंतर विजय मिळवीत गड काबीज केला आहे. महापालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात रितू तावडेंच्या रूपाने भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. त्यातच भाजपच्या हाती सत्ता आल्यानंतरच व्हीआयपी संस्कृती आणल्याचा आरोप होत आहे. महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरील निळे व लाल दिवे आणि नामफलक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांने निशाणा साधला असल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे या पुन्हा एकदा नव्या वादात अडकल्या आहेत. तावडे यांनी त्यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांमुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली असतानाही, भाजपच्या सत्तेत आल्यानंतर या नियमाला बगल दिल्याची टीका होत आहे. त्यातच दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही यावरून टीका केली आहे.

महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांच्या नव्या इनोव्हा गाडीच्या छतावर दिवे नसले तरी समोरच्या भागात (फ्रंट ग्रिल किंवा बंपरजवळ) लाल आणि निळे फ्लॅशिंग दिवे बसवलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या ताफ्यातील एक स्कॉर्पिओ गाडीवरही पोलिस वाहनांसारखे लाल-निळे दिवे लावलेले आहेत. यामुळे व्हीआयपी संस्कृती पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ‘नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारच्या नियमवालीनूसार 1 मे 2017 च्या अधिसूचनेनुसार, फक्त अग्निशमन, पोलीस, संरक्षण दल, अर्धसैनिक दल आणि आपत्ती व्यवस्थापन सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत रंगीत दिवे (लाल, निळा, पांढरा इ.) वापरण्याची परवानगी आहे. सामान्य सरकारी वाहनांवर असे दिवे, नामफलक किंवा ध्वज लावणे बेकायदेशीर आहे. अधिकृत काम नसताना असे दिवे वापरणेही नियमभंग मानले जाते. या नियमामुळे नऊ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने व्हीआयपी संस्कृती संपवल्याचे कौतुक झाले होते. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतही महापौरांच्या गाडीवरून लाल दिवा काढण्यात आला होता. आता मात्र, नव्या सत्ताधारी पक्षाने हा नियम मोडल्याची टीका होत आहे. त्यामुळे आता भाजपकडून या टीकेला आता कशा प्रकारे उत्तर दिले जात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणी महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामध्ये दोन दिवसापूर्वीच गाडीवरील दिवे कडून टाकण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या परिवहन विभागामार्फत महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी 13 नवीन गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये महापौरांसाठी एक टोयोटा इनोव्हा गाडी खरेदी करण्यात आली आहे. तर उपमहापौर, स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती, बाजार समिती, महिला-बाल कल्याण समिती, उद्यान समिती, विधी समिती, आरोग्य समिती इत्यादींच्या अध्यक्षांसाठी महिंद्रा स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना सीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता. पण बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यामध्ये महापौरांचा काहीच दोष नाही. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरु नयेत हा जुनाच आपला नियम आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असे वाटतय की त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही.'

Ritu Tawade
Hemant Rasane : पुण्यातील गॅस एजन्सी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात...; काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी भाजप आमदाराचे साकडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com