Jalna Shivsena News: जालन्यात मोठी राजकीय घडामोड; शिवसेना आमदारानं नगरसेवकांसह थेट मुंबई गाठली,भाजप नेत्यासोबत बंद दरवाजाआड खलबतं

Jalna Shivsena Political News: जालना महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना घेऊन आमदार अर्जुन खोतकर यांनी नुकतीच जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली.
Jalna News .jpg
Jalna News .jpgSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: जालना महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना घेऊन आमदार अर्जुन खोतकर यांनी नुकतीच जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. जालना महापालिकेत भाजपाची बहुमतासह शतप्रतिशत सत्ता आहे. भाजपसोबत निवडणुकीत युती न होऊ शकल्याने शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागले.

महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये राडा झाला होता. भाजपचे अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांच्यात खडाजंगी झाली होती. राज्याच्या सत्तेत शिवसेना-भाजप एकत्र असले तरी स्थानिक राजकारणात हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

भविष्यात शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्षात शहराच्या विकासकामांना खीळ बसता कामा नये, या उद्देशाने अर्जुन खोतकर यांनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना सोबत घेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. खोतकर हे पंकजा मुंडे यांना आपली बहीण मानतात. खोतकर यांचे मुंडे कुटुंबियांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांसह पंकजा मुंडे यांची भेट व बैठक झाली. या बैठकीत शहरातील विविध नव्याने प्रस्तावित विकास कामांवर सखोल चर्चा करण्यात आली. जालना शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था, स्वच्छता, तसेच नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विस्तृत आढावा घेण्यात आला.

Jalna News .jpg
Gore Reply Bhalke : जयकुमार गोरेंचा गर्भित इशारा : ज्या दिवशी डोक्यावरून पाणी जाईल; त्या दिवशी भगीरथ भालकेंचं सगळंच काढेन

शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीबाबतही सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच विविध प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन पकंजा मुंडे यांनी सर्व नगरसेवकांना दिल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे यांनी जालना शहराच्या विकासासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच आमदार अर्जुन खोतकर यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे आवहन केले.

यावेळी विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेविका दर्शना झोल खोतकर, शिवसेना गटनेते दीपक राठोड, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेवक विजय जाधव, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, नगरसेविका पुजा भगत, नगरसेवक दिनेश भगत, नगरसेवक किशोर पांगारकर, नगरसेवक संजय डुकरे पाटील, नगरसेवक निखिल पगारे, नितीन जांगडे, नरेश खुदभैये तसेच शिवसेना युवा सेना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे जालना शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, येत्या काळात विविध विकासकामांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com