Raosaheb Danve News  Sarkarnama
मराठवाडा

Jalna Loksabha Election 2024 : ...अन् रावसाहेब दानवेंनी पत्नी निर्मला यांच्यासमोर हातच जोडले!

Raosaheb Danve News : जालना लोकसभेतील महायुतीचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे संपूर्ण कुटुंबच त्यांच्यासाठी प्रचारात उतरले आहे.

Tushar Patil

Jalna News : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामुळे देशासह महाराष्ट्राचंही राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालना लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे.त्यातच दानवेंनी आपल्या आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीचा अनुभव पणाला लावत प्रचारात आघाडी घेतली आहे.

जालना लोकसभेतील महायुतीचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे संपूर्ण कुटुंबच त्यांच्यासाठी प्रचारात उतरले आहे. दानवेंच्या संपूर्ण राजकीय जीवनात पहिल्या निवडणुकीपासून प्रचाराची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी निर्मला दानवे या गेल्या दीड महिन्यांपासून मतदारसंघाचे दौरे करत आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या अनुपस्थितीत त्या बहुतांश वेळेस मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या लग्नकार्य हजेरी लावतात . यंदा मतदारसंघातील लग्न कार्य व लोकसभा निवडणुकीचा प्रचार या दोन्ही जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहे. प्रचाराच्या निमित्ताने दिवसभर भोकरदन व बदनापूर तालुक्यातील प्रचार दौरा आटोपला.

पण तरीदेखील त्यांनी गुरुवारी (ता.2) रात्री छत्रपती संभाजीनगर येथील कोळगे वाघचौरे परिवाराच्या विवाहसमारंभाला त्यांनी भेट दिली. याचवेळी दोन्हीकडील मंडळींना भेटून निर्मला दानवे या पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाल्या. तर दुसरीकडे जालना जिल्ह्यातील प्रचार दौरा आटोपून रावसाहेब दानवे महायुतीचे संभाजीनगरचे उमेदवार संदिपान भुमरे(Sandipan Bhumare) यांच्यासोबत या विवाहस्थळी भेट देण्यासाठी आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विवाह समारंभाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दानवे यांच्या स्वागतासाठी कोळगे वाघचौरे परिवाराची मंडळी हजर होतीच दानवे देखील त्यांना नमस्कार करत भेटी घेत संवाद साधत होते त्याचवेळी निर्मला दानवे या नमस्कार करत सर्वांचा निरोप घेत बाहेर निघत असताना रावसाहेब दानवे व पत्नी निर्मला दानवे एकमेकांसमोर आलेत व दानवे यांनी त्यांना देखील हात जोडले व कशा आहात? प्रचार कसा सुरू आहे असा सवाल केला.(Loksabha Election 2024 )

यावर निर्मला दानवे यांनी हसून त्यांना प्रचार तुमचाच सुरू आहे असे उत्तर दिले. यावेळी उपस्थित मंडळींमध्ये एकच हशा पिकला.निर्मला दानवे यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून दानवे यांनी बहुदा अंदाज घेतला असावा की लग्नकार्यात देखील आपला प्रचार जोरात झालेला दिसतोय.

दानवेंच्या प्रचारात नातींचा पहिल्यांदाच सहभाग

रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार असून यंदाच्या प्रचारात पहिल्यांदाच त्यांच्या 'दोन नाती' भोकरदन शहरात प्रचार करत आहेत. यामध्ये आमदार संतोष दानवे यांची मोठी कन्या युवराज्ञी दानवे व माजी जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे यांची कन्या 'परी' या दोघांनी भोकरदन शहरातील विविध भागात आजी निर्मला दानवे यांच्यासोबत फिरून प्रचार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT