Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुक रिंगणातून माघार घेतलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांना साथ देण्याचा निर्णय जाहीर केला. समाजातील दरी दुर करण्यासाठी व मतदार संघातील विकासासाठी अंतरमनाने हाक दिल्याने आपण डॉ. योगेश क्षीरसागर यांना साथ देत असल्याचे मंगळवारी (ता. 12) क्षीरसागर यांनी जाहीर केले.
तत्पुर्वी जयदत्त क्षीरसागर, त्यांचे पुत्र रोहित क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर एकाच वाहनातून बैठकस्थळी आले. जगदीश काळे, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, आदींसह कुटूंबीय व जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Khsirsagar) यांचे समर्थक उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. योगेश क्षीरसागर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संदीप क्षीरसागर तर जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी अचनाक त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. जयदत्त क्षीरसागर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमध्ये एक मानले जातात. (Beed News) चौसाळा मतदार संघातून दोनदा तर बीड मतदार संघातून दोनदा असे चार वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या क्षीरसागरांनी पंचायत समितीचे सभापती, उपमंत्री ते राज्याचे कॅबीनेट मंत्री असा राजकीय प्रवास केलेला आहे.
राजकीय डावपेचात माहिर असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचे जिल्हाभरात नेटवर्क आणि मतदार संघात देखील मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेमुळे आता डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पारड्यात मोठी राजकीय ताकद आली आहे. दरम्यान, अंतरमनाने हाक दिल्याने आपण माघारही घेतली आणि आता डॉ. येागेश क्षीरसागर यांना समर्थन देण्याचाही निर्णय घेतल्याचे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
जाती जातीतील संघर्षाची दरी कमी करायची आहे. जनताच आपला परीवार असून विस्तारीत परिवाराची जबाबदारी आणि विकासाची घडी बसवायची आहे. त्यामुळे डॉ. योगेश क्षीरसागरला पाठींबा देण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाढप्या आपला असला की शिल्लक ताटात येते, आता डॉ. येागेशच्या रुपाने वाढप्या करायचा आहे, असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.