Karishma Nair IAS Sarkarnama
मराठवाडा

Karishma Nair IAS : यूपीएससीतही 'करिष्मा'; दुसऱ्याच प्रयत्नात १४ वी रँक अन् 'आयएएस'पदाला गवसणी!

Karishma Nair Deputy Collector Of Beed District : करिष्मा नायर कोरोनाकाळाच दिल्लीतून घरी परतल्या, पण प्रयत्न सोडले नाही...

Datta Deshmukh

Karishma Nair Profile in Marathi : आपल्या नावाप्रमाणेच करिष्मा नायर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देखील करिष्मा करून दाखवला. करिष्मा नायर यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएसी परिक्षेत देशात 14 वी रँक मिळवून आयएएस पदाला गवसणी घातली. आता बीड जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आहेत. विशेष बाब म्हणजे करिष्मा नायर यांनी हे यश कोणतेही कोचिंग न घेता, अभ्यास घरी स्वतःच केला. यामुळे त्यांच्या या यशाला फार झळाळून दिसते. (Latest Marathi News)

उच्चशिक्षीत व नोकरदार कुटूंबातील करिष्मा नायर -

पदवीच्या दुसऱ्या वर्षात असताना त्यांना भारतीय प्रशासन सेवेबद्दल वाचण्यात आले. त्यांनाही वाटले आपणही आयएएस व्हायचे. त्यानुसार आयएसएस परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेल्या, मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयशाचे तोंड पहावे लागले. योगायोगाने कोरोना संसर्गाची सुरुवात झाल्याने, त्यांना परत मुंबईला यावे लागल्याने स्वत:च घरी अभ्यास केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

देशात १४ वी रँक, महाराष्ट्र केडरची निवड -

मूळच्या केरळ राज्यातील पालक्कड येथील रहिवाशी असलेल्या करिष्मा नायर यांचे वडिल पी. व्ही. नंदकुमार मुंबईत बँक अधिकारी व आई गिता नंदकुमार या शिक्षिका आहे. तर, त्यांची मोठी बहिण कार्तिक फेसबुकमध्ये नोकरीला आहे. नोकरी निमित्त त्यांचे कुटुबिय मुंबईतच स्थायिक आहे.

केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेतलेल्या करिष्मा नायर यांना दहावीत देखील ए प्लस प्लस ग्रेड मिळाला. 12 वी विज्ञान शाखेतून 92.08 टक्के गुण मिळविलेल्या करिष्मा नायर यांनी मुंबईच्या इन्स्टीट्युट ऑफ फॉरेन्सिक सायन्समधून फॉरेन्सिक सायन्स विषयात विशेष प्राविण्यासह पदवीची परिक्षा उत्तीर्ण केली.

पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना करिष्मा नायर यांनी भारतीय प्रशासन सेवेबद्दल वाचले. तेव्हा आपणही या सेवेत जावे, असे त्यांना वाटले. पदवी उत्तीर्ण होताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी दिल्ली गाठली. 2019 साली त्यांनी प्रथम परिक्षा दिली. मुलाखतीपर्यंत त्यांनी मजल मारली.

मात्र, यश आले नाही. योगायोगाने कोरोनाची साथ सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे त्यांना परत मुंबईला यावे लागले. मुंबईत त्यांनी स्वत:च पुन्हा अभ्यास केला. 2029 साली दिलेल्या परीक्षेत त्यांनी देशात 14 वी रँक मिळविली. त्यांची भारतीय प्रशासन सेवेसाठी (आएएस) निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र केडर निवडले.

दरम्यान, एक वर्षे मसूरी येथे भारतीय प्रशासन सेवेचे प्रशिक्षण केल्यानंतर त्यांची सिंधूदुर्ग जिल्ह्यात परिविक्षाधिन कालावधीसाठी निवड झाली. त्यांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी आदी पदांवर काम केले. महिनाभरापूर्वी त्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बीडच्या उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

आपण भारतीय प्रशासन सेवेत निवडीसाठी केवळ दोन परीक्षा देण्याचे ठरविले होते. दुसऱ्या परीक्षेत अपयश आले असते तर फॉरेन्सिक सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी करणार होते, असे करिष्मा नायर सांगतात. बॅडमिंटन खेळाची आवड असलेल्या करिष्मा नायर महाविद्यालयीन काळात वाद - विवाद स्पर्धांतही सहभागी घेत. आंतरमहाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरीय स्पर्धांत त्यांनी बक्षीसेही मिळविली आहेत.

'महिला सक्षमच असल्याचा अनुभव आपण शिक्षण काळात व परिविक्षाधिन काळात घेतला आहे. महिलांमध्ये अधिक आत्मविश्वास व समाज आणि कुटूंबातून त्यांना पाठबळ व प्रोत्साहन मिळाले तर त्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात, असे नायर सांगतात.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT