BJP MLA Abhimanyu Pawar seen with former MLAs Busvaraj Patil and Dinkar Mane, whose entry into BJP has altered the political equations of Ausa Assembly constituency. Sarkarnama
मराठवाडा

Kasar Shirshi controversy : आमदार अभिमन्यू पवारांनी अखेर हट्ट सोडला; 'ती' गावे निलंगा तालुक्यातच राहणार!

Kasar Shirshi Upper Tehsil News : आंदोलने, बंद पाळत निर्णय मागे घेण्यासाठी दबाव निर्माण गेला. संभाजी पाटील निलंगकेर, अरविंद पाटील निलंगेकर या दोन भावांनी या लढ्याला पडद्यामागून बळही दिले.

सरकारनामा ब्युरो

राम काळगे

BJP News : कासार शिरशी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मीती करत त्यात निलंगा तालुक्यातील 68 गावांचा समावेश करत औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मोठी राजकीय खेळी केली. निलंगेकरांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. आंदोलने, बंद पाळत निर्णय मागे घेण्यासाठी दबाव निर्माण गेला. संभाजी पाटील निलंगकेर, अरविंद पाटील निलंगेकर या दोन भावांनी या लढ्याला पडद्यामागून बळही दिले.

मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक आणि भविष्यात राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी अभिमन्यू पवार यांनी विरोध मोडून काढला. पण याचा फटका नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पक्ष आणि पवार यांना बसला. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही कासार शिरशी अप्पर तहसील कार्यालय आणि त्यात समावेश करण्यात आलेल्या 68 गावांचा मुद्दा तापला. मतदारांनी थेट बहिष्काराची भाषा सुरू केली.

त्यानंतर अखेर अभिमन्यू पवार (Abhimnyu Pawar) नरमले. पुढील सहा महिन्यात ही संपूर्ण गावे निलंगा तालुक्यातच राहतील, अशी ग्वाही देत पवार यांनी मतदारांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. निलंगा तालुक्यातील 68 गावांमधील सीमावादाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

ही गावे औसा मतदारसंघातील कासार शिरशी अप्पर तहसीलला जोडू नयेत, यासाठी 'कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कृती समिती'चे अध्यक्ष संभाजी तारे यांनी रान पेटवले होते. हायकोर्टातील निकाल विरोधात गेल्यावर या 68 गावांतील जनतेने मतदानावर बहिष्काराचे हत्यार उपसले आणि भाजपला (BJP) मतदान न करण्याचा पवित्रा घेतला.

गावागावातून उमटलेला हा संताप पाहून आमदार अभिमन्यू पवार यांनी नमती भूमिका घेतली आहे. 'सहा महिन्यांत ही गावे निलंगा हद्दीतच राहतील', असा शब्द त्यांनी दिला. एका सामान्य कार्यकर्त्याच्या संघर्षापुढे आमदारांना नमते घ्यावे लागल्याची चर्चा सध्या तेरणा काठावर रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT