Sudhakar Shrangare Sarkarnama
मराठवाडा

Latur Loksabha Constituency : चिखलीकरसाहेब, मला गेल्यावेळी पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून द्या; श्रृंगारेंची साद

राम काळगे

Latur News : गेल्या निवडणुकीत लातूरकरांनी मला मोठ्या मताधिक्याने निवडून देत सेवेचे संधी दिली. मी पण पाच वर्षात मतदारसंघासाठी विकास निधी कमी पडू दिला नाही. आता दुसऱ्यांदा मला लातूरकरांचा आशीर्वाद मिळणार आहे. चिखलीकर साहेब गेल्या निवडणुकीत तुम्ही मला कंधार-लोहा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले होते, यावेळी तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, असे म्हणत लोकसभेच्या लातूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी त्यांना साद घातली.

नांदेड लोकसभेचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर (Prataprao Chikhalikar) त्यांच्या मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता लातूरचे सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. देशाला पंतप्रधान मोदी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व हवे आहे. त्यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मागील दहा वर्षात राबविलेल्या विकास योजनांची माहिती मतदारांना प्रत्यक्ष भेटून द्यावी. लोहा विधानसभा क्षेत्रात खासदार सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shringare) यांना मताधिक्य देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन चिखलीकर यांनी केले.

लोहा येथील व्यंकटेश गार्डनमध्ये बुथ प्रमुख व प्रमुख पदाधिकार्‍यांची संवाद बैठक चिखलीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही निवडणूक देशाची आहे. खासदार श्रृंगारे यांनी या मतदार संघासाठी भरपूर निधी दिला आहे. त्यांना पुन्हा संधी दिल्यास ते लातूरसाठी निधी कमी पडू देणार नाही.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधान करायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी आळस झटकून कामाला लागले पाहिजे. मागील निवडणूकीत जे मताधिक्य दिले त्यापेक्षा अधिक यावेळी मिळाले पाहिजे, असे आवाहन चिखलीकरांनी या बैठकीत केले.आपण या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चिखलीकर व परिवाराने मला नेहमीच साथ दिली आहे. यावेळी मागील निवडणुकी प्रमाणेच मताधिक्य द्याल, असा विश्वास सुधाकर श्रृंगारे यांनी बैठकीत व्यक्त केला. लातूर मध्ये महायुतीचे सुधाकर श्रृंगारे विरुद्ध महाविकास आघाडीचे डाॅ. शिवाजी काळगे यांच्यात थेट लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे लातूरची लढत तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी सुधाकर श्रृंगारे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरमध्ये सभा घेत जिल्ह्याच्या विकासाची गॅरंटी घेतली आहे. येत्या 7 मे रोजी लातूरमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी प्रचारात वेग घेतला आहे. आता हा प्रचार अंतिम टप्यात आला असून भाजप हॅट्र्रीकसाठी तर काँग्रेस हा मतदारसंघ पुन्हा खेचून घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT