Lok Sabha Election 2024 : 'शरद पवार- उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक'; बावनकुळेंनी डिवचलं!

Chandrashekhar Bawankule News : "केंद्र शासनाच्या कामगिरीवर आपल्याला भर द्यावा लागेल. विरोधी पक्षांकडे क्षमता राहिलेली नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक असेल."
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या भाजपच्या लोकसभा उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक झाली. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी धास्ती न बाळगता मतदारांमध्ये जावे, अशी सूचना केली.

भारतीय जनता पक्षाच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख माजी आमदार बाळासाहेब सानप, आमदार राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ, केदा आहेर, सुनील बच्छाव यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातील राजकीय स्थितीविषयी माहिती दिली. विरोधकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बहुतांशी भाजप कार्यकर्ते निराश असल्याचे जाणवले.

या कार्यकर्त्यांनी कांदा निर्यातबंदीबाबत केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाने मतदारांमध्ये प्रचार करणे अवघड झाले आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. पवार यांच्याकडून फारसा संपर्क नाही. त्यांच्या कामकाजाविषयी तक्रारींचा सूर या बैठकीत दिसून आला. अनेक पदाधिकारी याच एकसुरी तक्रारी करीत होते.

Lok Sabha Election 2024
Rupali Ganguly joins BJP : 'अनुपमा' फेम अभिनेत्रीची राजकारणात धमाकेदार एन्ट्री

बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या या चर्चेत हस्तक्षेप केला. एकमेव कांदा प्रश्न हा लोकसभा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. भाजपच्या केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचा प्रचार मतदारांमध्ये जाऊन करा.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी अनेक कामे केली आहेत. त्या प्रचारावर भर द्या. विरोधकांकडे कांदा प्रश्न असेल तर, आपल्याकडेदेखील मोदी यांचे व्हिजन आहे. त्यामुळे नकारात्मक सूर सोडून भाजपला विजयी करण्यासाठी आक्रमक प्रचार करा, अशी सूचना त्यांनी या वेळी केली.

Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Manifesto: पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? पवार गटाचा 'शपथनामा' प्रसिद्ध होताच भाजपची टीका
Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

या वेळी बावनकुळे यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळणार आहे. केंद्र शासनाच्या कामगिरीवर आपल्याला भर द्यावा लागेल. विरोधी पक्षांकडे क्षमता राहिलेली नाही. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक असेल.

या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव होईल. त्यानंतर ते कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्याच्या ताकदीचे राहणार नाहीत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हावे, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com