Karale Guruji On Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मंगळसूत्रावरून कराळे गुरूजींचे टोमणे...

BJP News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती भाजपची पिछेहाट होत आहे. विदर्भात 12 जागांवर निवडणूक झाली. तिथे गावागावात मोदी सरकार नको आहे, असा कल होता.
Narendra Modi, Karale Guruji
Narendra Modi, Karale Gurujisarkarnama

Nagar Political News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समर्थनात नगर येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यात नीतेश कराळे गुरूजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळसूत्रावर टोमणे मारले. हे टोमणे अस्सल वैदर्भीय भाषेतून लगावल्याने तो अधिक खोचक ठरला आहे. 'दहा वर्षात काय केले ते सांगा.

ते सांगता येईना. तशी त्यांना सांगायला जागाच राहिली नाही. म्हणून मंगळसूत्रावर बोलले. मंगळसूत्र त्यांनीच त्यांच्या बायकोचे नेले. दुसर्‍याच्या मंगळसूत्राची कशाला काळजी करायची. आपल्या मंगळसूत्राचे पाहा', असा टोमणा कराळे गुरूजींना लगावला आहे.

संभाजी ब्रिगेडने नगरमध्ये मेळावा घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर मेळाव्याला उपस्थित होते. कराळे गुरूजींना यावेळी केलेले भाषण गाजले. त्यांनी अस्सल वैदर्भीय भाषणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

कराळे गुरूजी म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती भाजपची पिछेहाट होत आहे. विदर्भात 12 जागांवर निवडणूक झाली. तिथे गावागावात मोदी सरकार नको आहे, असा कल होता. मोदी नकोच आहे. 2014 तशी मोदी लाट होती, तशी त्याविरोधात आता लाट आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीच म्हणत आहे की, सत्ता येणार आहे.

Narendra Modi, Karale Guruji
Nitesh Karale MLA Offer: ‘या’ पक्षांकडून आली ऑफर, कराळे गुरुजींना लागले आमदारकीचे वेध!

चारशे पारचा नारा नौटंकी आहे". महायुती भाजप दोनशेच्या आतमध्ये येतील. यामुळे भाजपवाले मुख्य मुद्यांवर बोलत नाही. सांगायला जागाच नाही. दहा वर्षात तुम्ही काय केले ते सांगा. जागाच म्हणून मंगळसूत्रावर बोल लागलेत.

मंगळसूत्र चोरीला जाईल. मंगळसूत्र त्यांनी त्यांच्या बायकोचे नेले. दुसर्‍याच्या मंगळसूत्राची काय काळजी करता. आपल्याच घरच्या मंगळसूत्राकडे पाहा ना, असा टोला कराळे गुरूजींना लगावला.

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी चारशे पार जागा आल्यावर संविधान बदलू, अशी भाषा करत आहेत. परंतु संविधान का बदलणार याची स्पष्टोक्ती नाही. संविधानावर घाला घालत असेल, तर यांना सर्वसामान्य नागरिक भाजपला मतदान करणार नाही. हाच रोष मतदानातून पुढे येत आहे', असेही कराळे गुरुजी यांनी म्हटले.

Narendra Modi, Karale Guruji
Nagar South Lok Sabha Constituency : निवडणुकीतून माघार घेतल्याने 'MIM'च्या उमेदवारास थेट पाकिस्तानातून मिळाली धमकी?

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांचे काम संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. कोविड काळात त्यांनी जी सेवा केली आहे.

तसेच आमदार असता त्यांनी मतदारसंघासह नगर दक्षिणमध्ये संपर्क ठेवून जनमत कामाच्या माध्यमातून तयार केले आहे. यामुळे त्यांना यश नक्की मिळेल, असेही कराळे गुरूजी यांनी म्हटले.

Edited By : Umesh Bambare

Narendra Modi, Karale Guruji
Nagar Loksabha : रोहित पवारांचा सुजय विखेंना मित्रत्वाचा सल्ला, 'अर्ज मागे घ्या...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com