Lok Sabha Election 2024  Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : हिंगोलीचा गोंधळ संपता संपेना; आता बंडखोरांना थंड करण्याचं महायुतीपुढे आव्हान!

Chetan Zadpe

Hingoli News : महायुतीमधील शिवसेना पक्षाने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना दिलेली उमेदवारी ऐनवेळी तडकाफडकी बदलण्यात आली. खासदार पाटील यांच्या (Hemant Patil) जागी बाबूराव कदम कोहळीकर (Baburao Patil Kohlikar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवार बदलानंतरही स्थानिक भाजप कार्यकर्ते मात्र नाराज आहेत. या जागेवर भाजपचाच हक्क असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. शिवसेना उमेदवाराचे काम करणार नसल्याचे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भावना गवळी यांचाही पत्ता कट केला आहे, त्या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयांनी पत्ता कट झालेल्या खासदारांची नाराजी असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजप नेत्यांनी बंडखोरीचं डोके वर काढल्याने आता महायुतीपुढे अडचणीचे डोंगर उभे राहिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंगोली लोकसभेमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. कारण महायुतीच्या जागावाटपामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलेली जागा भाजप नेत्यांच्या बंडखोरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आतापर्यंत भाजपमधील तीन मोठ्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, यामध्ये भाजपचे लोकसभा संघटक रामदास पाटील, भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते योगी श्याम भारती व भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव जाधव यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पार्टीचे मोठे संघटन लोकसभा मतदारसंघात असून, या जागेवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो, त्यामुळे हिंगोलीची (Hingoli) जागा भाजपला सोडावी, अशी मागणी या बंडखोरी करणाऱ्या नेत्यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, जागावाटपामध्ये ही जागा शिवसेनेला गेल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यवतमाळ -वाशीम लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले होते. ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे, तेथे राजश्री हेमंत पाटील यांचा प्रचाररथ दाखल झाल्याने जवळपास राजश्री पाटील याच महायुतीच्या उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार आता त्यांची उमेदवारी दाखल झाली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT