Hingoli Loksabha Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha News : शिंदेंचा मोठा निर्णय, हिंगोलीचा उमेदवार बदलला; हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकर

Loksabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील एकमेव हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली.

Deepak Kulkarni

Hingoli Loksabha News : शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच दुसरी यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, पहिल्या यादीत उमेदवारी मिळालेल्या हिंगोली आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारांबाबत मोठी नाराजी असून, त्या ठिकाणचे उमेदवार बदलण्याची मागणी केली जात आहे. त्याचमुळे सध्यातरी विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे.

याचदरम्यान, सध्यातरी विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, सहा जणांचं तिकीट कापणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यात हातकणंगले आणि हिंगोली मतदारसंघांचं नाव आघाडीवर आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी हिंगोलीबाबत मोठा निर्णय घेतानाच हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केली.

शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील एकमेव हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha 2024) मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. या उमेदवारीनंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे.एकीकडे नाशिकमध्ये हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि यवतमाळ वाशीम मतदारसंघातून भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वी राज्यातील आठ उमेदवार शिंदे गटाकडून जाहीर झाले, त्यात मराठवाड्यातील या एकमेव जागेचा समावेश होता. हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला, पण दावेदारी सांगणाऱ्या भाजपमधील इच्छुकांच्या आशेवर मात्र पाणी फिरले. याचे पडसाद हळूहळू उमटायला लागले असून, शिवाजी माने यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT