Delhi Political News : ‘आप’च्या अडचणी थांबेनात; भाजप आतिशी यांना अडकवणार?

AAP Leader Atishi News : भाजपमध्ये या नाहीतर तुरुंगात जा, अशी ऑफर नेत्यांनी दिल्याचा आरोप आतिशी यांनी मंगळवारी केला होता. भाजपने त्यांना याबाबत आव्हान दिले होते.
AAP Leader Atishi
AAP Leader AtishiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : आम आदमी पक्षासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह तुरुंगात आहेत. (Delhi Political News) इतर काही नेत्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपने आपच्या नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांना अडचणीत आणले आहे.

आतिशी (Atishi) यांनी मंगळवारी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले होते. भाजपमध्ये या नाहीतर एक महिन्यात तुरुंगात जा, अशी ऑफर भाजपने दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर भाजपने कालच पलटवार करत कोणत्या नेत्याने ऑफर दिली, त्यांचे नाव उघड करण्याचे आव्हान आतिशी यांना दिले होते.  

AAP Leader Atishi
ED in Supreme Court : ED च्या वकिलांमध्ये भाजप नेत्या बांसुरी स्वराज यांचे नाव; नेमकं काय आहे प्रकरण?

या मुद्द्यावर दिल्ली (Delhi) भाजपने आज आतिशी यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. आतिशी यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे आता आतिशी काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा (Virendra Sachdeva)यांनी नोटिशीबाबत माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सचदेवा यांनी सांगितले की, आतिशी यांना कुणी, कधी आणि कशी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, याचे पुरावे त्या देऊ शकल्या नाहीत. दिल्ली आप (AAP) समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे नेते बिनबुडाचे आरोप करत आहेत. मात्र, आम्ही त्यांना असेच सोडणार नाही, असा इशाराही सचदेवा यांनी दिला.

काय म्हणाल्या होत्या आतिशी?

आतिशी यांनी काल मीडियाशी बोलताना म्हटले होते की, भाजप नेत्यांशी जवळीक असलेली एक व्यक्ती आपल्याकडे आली होती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली. तुमचे राजकीय करिअर वाचवू, असे ते म्हणाले. मी भाजपमध्ये गेले नाही तर ईडी महिनाभरात तुम्हाला अटक करेल, अशी धमकीही त्यांनी दिल्याचा आरोप आतिशी यांनी केला होता.

R

AAP Leader Atishi
Vijender Singh News : काँग्रेसला ‘ठोसा’; बॉक्सर विजेंदर सिंग भाजपच्या ‘रिंग’मध्ये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com