Jyoti Mete - Sharad Pawar- Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Beed Loksabha News : बीडमध्ये मोठ्या राजकीय हालचाली; पंकजा मुंडेंविरोधात ज्योती मेटे निवडणूक लढवणार?

Shivsangram Politics: ...यानंतर डॉ. ज्योती मेटे यांनी खंबीरपणे संघटनेला सांभाळल्याने त्यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Datta Deshmukh

Beed News :  बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पंकजा मुंडे यांचा यानिमित्ताने राजकीय वनवास संपणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंडेंविरोधात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. यात आघाडीवर नाव असलेल्या दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा सूर शिवसंग्रामच्या बैठकीत आळवला गेला आहे.

शिवसंग्रामची सोमवारी भवनमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यात कार्यकर्त्यांनी डॉ. मेटे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी भावना व्यक्त केली. भाजपने सलग दोनवेळा बीडमधून खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांची उमेदवारी टाळून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव निश्चित केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील उमेदवारीसाठी विविध नावांची चर्चा आहे. यात प्रामुख्याने शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांचेही नाव चर्चेत येत आहे.

शिवसंग्रामसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियातून डॉ. मेटेंनी निवडणुक लढवावी, असा ट्रेंड चालविला. याच पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात गणेश ढवळे, दिनेश पवार, कैलास माने, नामदेव गायकवाड, उत्तम पवार, फिरोज पठाण, सुग्रीव मुंडे, धनेश गोरे, माऊली शिंदे, कैलास नाईकवाडे, ज्ञानेश्वर चौधरी, मनीषा कुपकर, साक्षी हंगे आदींची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी निवडणुक लढवावी, असा सुर आवळला. दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांनी समाजातील विविध घटकांच्या न्याय मागण्यांसाठी आयुष्य झिजविले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीला जात असतानाच त्यांची दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात डॉ. ज्योती मेटे यांनी खंबीरपणे संघटनेला सांभाळल्याने त्यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या भावना डॉ. मेटेंच्या कानी घालणार असल्याचे जिल्हाध्यक्ष काशिद म्हणाले.

दरम्यान, बीडला बैठक असल्याची माहिती झाल्यानंतर अंकुश कदम नावाचा समर्थक ठाण्याहून पोचला. आपण ठाणे येथे जॉब करतो. डॉ. मेटे यांनी निवडणूक लढवावी, आपण एक महिन्याची रजा टाकून तन - मन - धनाने त्यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT