pritam munde pankaja munde sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde On Pritam Munde : प्रीतम यांना आता कुठली संधी मिळणार? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

Pankaja Munde On Lok Sabha Election : "धनंजय मुंडेंमुळे प्रीतम मुंडेंपेक्षा अधिक मतांनी मी निवडून येणार," असा विश्वास पंकजांनी व्यक्त केला.

Akshay Sabale

बीड लोकसभा निवडणुकीसाठी ( Beed Lok Sabha Election 2024 ) भाजपचा नेमका उमेदवार कोण? याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कारण, बीड जिल्ह्याची निवडणूक कोणतीही असो ती एकदम रंगतदार असते. त्यामुळे या निवडणुकांकडे सतत सगळ्यांचं लक्ष असतं. लोकसभेला प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे यांना संधी मिळणार, असा प्रश्न उभा केला जात होता. अखेर दुसऱ्या यादीत भाजपनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. "पण, ही उमेदवारी सन्मानजक गोष्ट आहे," अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) म्हणाल्या, "प्रीतम मुंडे 10 वर्षे खासदार होत्या. तेव्हा मी राज्याचं राजकारण करत होते. एकदम केंद्राच्या राजकारणात जात असल्यानं संमिश्र भावना आहेत. पण, नवीन अनुभवासाठी नेहमीच तयार असते."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"प्रीतम खासदार असताना मी घरी बसले"

प्रीतम मुंडेंना राजकारणात आता कुठली संधी मिळू शकते? या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी म्हटलं, "गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे ( Pritam Munde ) डॉक्टरी पेशा सोडून राजकारणात आल्या. मी राज्य तर प्रीतम मुंडे जिल्ह्याचं राजकारण सांभाळत होत्या. प्रीतम मुंडे पाच वर्षे खासदार असताना मी घरी बसले आहे. पण, जास्त वेळ प्रीतम मुंडेंना वाट बघावी लागणार नाही. प्रीतम यांना विस्थापित करणार नसल्याचं मी सांगितलं होतं. त्या शब्दावर मी कायम आहे."

"राजकारणात खडतर प्रवास कायम असतो"

राजकीय वनवास संपला का? या प्रश्नावर पंकजा मुंडे स्मितहास्य करत म्हणाल्या, "राजकारण हा एक मोठा खडतर प्रवास आहे. तो कायम असतो. बीड जिल्ह्याची जनता निवडणुकीत काय कौल देणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण, प्रीतम यांनी निवडणूक प्रचंड संघर्ष करून जिंकली होती. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत काय परिस्थिती निर्माण होते? यासाठी मी उत्सुक आहे."

"दोघींपैकी एकीचं नाव निश्चित होतं"

"धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी आणि भाजपची युती राज्यात आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या बीड जिल्ह्यातही आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे धनंजय मुंडेंमुळे प्रीतम मुंडेंपेक्षा अधिक मतांनी मी निवडून येणार. तसेच, आमच्या दोघींपैकी एकीचं नाव यादीत येणार, हे निश्चित होतं," असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT