NCP-BJP Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Parbhani Constituency : महायुतीचे कार्यकर्ते पेचात, कोणता झेंडा घेऊ हाती

Lok Sabha Election 2024 :महाविकास आघाडी लागली कामाला, महायुतीचे काय ठरेना

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असल्यामुळे प्रत्येक पक्ष सज्ज आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ठाकरे गटाचे संजय जाधव हे जवळपास निश्चित आहेत. निवडणुकीच्या मैदानात त्यांच्या विरुद्ध कोण उतरणार?  हे महायुतीने अद्याप जाहीर केले नसल्याने तीनही पक्षांचे कार्यकर्ते पेचात असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभेच्या राज्यातील जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय जनता पक्षाने पूर्ण तयारी केली आहे. पक्षाने दोन महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणूक प्रमुख व समन्वयकांची नियुक्ती केली. तसेच नुकतेच गाव चलो अभियान राबवण्यात आले. पक्षाच्या विविध बैठकात नेत्यांनी ठामपणे सांगितले की उमेदवार कोणीही असो पक्षचिन्ह कमळ हेच असेल. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचे कमळ हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार का ? अशी शंका उपस्थित होऊ लागली. भारतीय जनता पक्षाकडून जिंतूर विधानसभा मतदारसंघातील आमदार मेघना बोर्डीकर या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. पक्षाने त्यांची नियुक्ती महायुतीच्या समन्वयक म्हणून करून या दाव्याला बळ दिले.

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राजेश विटेकर हे दावेदार आहेत. पक्षाने त्यांच्यावर महायुतीचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. मानवत येथे महायुतीचा मेळावा घेऊन त्यांनी आपली मागणी पुढे रेटली. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मेळाव्यास उपस्थित राहून विटेकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. तसेच शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनीही जिल्ह्यातील शिवसेनेची आढावा बैठक घेऊन परभणी लोकसभा मतदारसंघावर आपलाही दावा असल्याचे जाहीर केले.

जिल्ह्यातील धर्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा असलेल्या पाथरी येथील साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास निधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा करून ५० कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात त्यांनी यश मिळवले. यामुळे पाथरी येथील विकासकामे निश्चितच मार्गी लागतील. परंतु भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर यांना पक्षातील अंतर्गत गटबाजीला आळा घालण्यासाठी मोठी मेहनत घेण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.

भाजपच्या गोटात बोर्डीकर यांच्याऐवजी दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा असा एक सुप्त मतप्रवाह असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राजेश विटेकर हे एकमेव दावेदार असले तरी त्यांची आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार दुर्राणी यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदाची पार्श्वभूमी आहे. विटेकर यांनी मानवत येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यात दुर्राणी उपस्थित नव्हते. त्यामुळे जागावाटप आणि उमेदवार जाहीर झाले नसल्याने कार्यकर्ते  संभ्रमात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT