Gopinath Munde-Mahadev Jankar Sarkarnama
मराठवाडा

Mahadev Jankar : 'आप मुंडेसाहब के बेटे है क्या?' त्या वेळी माझ्या डोळ्यातून पाणी आले : जानकरांनी सांगितला ग्वाल्हेरमधील किस्सा!

Gopinath Munde Memorial Day : गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला या देशात फिरण्याची उंची दिली, त्या उंचीसाठी त्यांना अभिवादन करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी दरवर्षी बीडमध्ये येत राहणार आहे. मुंडे यांच्यामुळे आमच्यासारख्या माणसाला देशभर ओळख निर्माण झाली आहे.

Vijaykumar Dudhale

Beed, 03 June : गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन असून त्यांना विविध नेत्यांकडून अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनीही आज बीडमध्ये जाऊन मुंडे यांना अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जानकर यांनी गोपीनाथ मुंडेंबाबत मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडलेला किस्सा सांगितला. तेथील एका सरपंचाने विचारलेल्या प्रश्नामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले, असेही जानकर यांनी नमूद केले आहे.

महादेव जानकर म्हणाले, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी आम्हाला या देशात फिरण्याची उंची दिली, त्या उंचीसाठी त्यांना अभिवादन करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी दरवर्षी बीडमध्ये येत राहणार आहे. मुंडे यांच्यामुळे आमच्यासारख्या माणसाला देशभर ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या छायेखाली वावरल्यामुळे आज आम्हाला छोट्यापासून मोठ्यापर्यंत ओळखू लागले आहेत, त्यामुळे त्यांचे ऋण आमच्या डोक्यावर आयुष्यभर राहणार आहे.

मी गोपीनाथ मुंडे यांचा मानसपुत्रच आहे. जिस बापका बेटा लायक होता है, उस बापकी इज्जत होती. त्या प्रमाणे गोपीनाथ मुंडे यांचे नाव कसं चालेल. चांगलं कसं घेतलं जाईल, त्यादृष्टीने मरेपर्यंत, माझा राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) कटीबद्ध असेल, असेही जानकर यांनी नमूद केले.

महादेव जानकर म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पंकजा मुंडे ह्या दरवर्षी आरोग्य शिबिर, धार्मिक कार्यक्रम घेत असतात. या उपक्रमांच्या माध्यमातून गाेरगरिब लोकांना चांगली सेवा मिळते. गोपीनाथ मुंडेंची विचारधारा या देशात कशी जाईल, हेच आम्ही पाहतोय. गोपीनाथ मुंडे यांनी आमची उंची वाढवली आहे. त्याबद्दल त्यांना नतमस्तक होण्यासाठी ३ जूनला मी बीडला जीवंत असेपर्यंत येत राहणार आहे.

आम्ही काल (ता. ०२ जून) ग्वाल्हेरला होतो. ग्वाल्हेरला गुर्जर समाजाचा एक सरपंच माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ‘आप मुंडेसाहब के बेटे है क्या? त्या वेळी माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आले. ग्वाल्हेरमध्ये आम्ही एका रानात थांबलो असताना गुर्जर समाजाच्या सरपंचाने माझ्या जवळ येऊन हा प्रश्न विचारला. त्यावेळी ‘हो मी त्यांचा मुलगाच आहे,’ असे त्या सरपंचाला मी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT