Mahadev Jankar : महादेव जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; थेट दिल्लीतून केली घोषणा (Video)

Maharashtra Political News : मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. विधानसभा निवडणुकीपासूनच मी एनडीएला सोडले आहे. एनडीएला सोडले म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला सोडले आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 30 May : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादवांना निमंत्रित करत पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे, असे सूचक विधान करत महादेव जानकर यांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्याबाबतची घोषणा त्यांनी थेट दिल्लीतून केली आहे.

महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच, देशभरातून सहा रथ दिल्लीत दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय इतरही छोटे मोठे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादव या तिघांकडूनही मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी आमचं आदरातिथ्य उत्तमरित्या केले. जबाबदार आणि मोठा नेता असून गांधी यांनी मला जो रिस्पेक्ट दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्याविषयी मला आत्मियता आहे, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, शरद पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत, ते आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. अखिलेश यादव हे तर माझे मित्रच आहेत. हे तीन नेते अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला येत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि तेजस्वी यादव यांना निमंत्रण दिलेले आहे. मात्र, त्यांची अजून समंती आलेली नाही. उद्यापर्यंत त्यांचाही कार्यक्रमाला येण्याबाबतचा होकार येईल, अशी आशा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भांत अजून काहीही निर्णय झाला नाही. राष्ट्रीय समाज पक्षाची स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी आहे. अहिल्यादेवी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मी राहुल गांधी आणि शरद पवार यांना बोलवत आहे. राजकीय चर्चा अजून काहीही झालेली नाही. सध्या जयंती उत्सव सोहळ्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar
NCP SP News : स्थापनेपासून राष्ट्रवादीसोबत असलेल्या नेत्याने शरद पवारांची साथ सोडली; अनिल देशमुखांनाही धक्का

जानकर म्हणाले, अहिल्यादेवी होळकर जयंतीनंतर राहुल गांधी, शरद पवार यांच्याकडून इंडिया आघाडीच्या प्रवेशाची ऑफर आली तर एकमेकांच्या ॲडजेस्टमेटने आघाडी करता येईल. मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. विधानसभा निवडणुकीपासूनच मी एनडीएला सोडले आहे. एनडीएला सोडले म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला सोडले आहे. आम्ही आता एनडीएसोबत नसल्याने आघाडीबाबत कोणताही प्रॉब्लेम नाही. मी आता नवीन घरोबा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा पुढून किती प्रतिसाद येतोय, त्यावर पुढील गोष्टी ठरवल्या जातील.

राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आततायीपणा करणार नाही. आम्ही एकमेकांशी पूरक भूमिका घेऊ. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल. राष्ट्रीय समाज पक्षानेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आता सध्या आम्ही एनडीएमध्ये नाही, हे मात्र फायनल आहे, असेही महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar
Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? पालकमंत्री जयकुमार गोरेंचे मोठे विधान...

चौंडीच्या जयंतीबाबत भाष्य

अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला पहिल्यांदा मी सुरू केली. मात्र, चौंडीत सरकारने जयंती साजरी करायला सुरूवात केल्यानंतर ती जयंती बंद करून मी मुंबईला जयंती सोहळा सुरू केला. जिथं सरकार येतं, तिथली जयंती मी बंद करून नव्या ठिकाणी जयंती सोहळा घेतो. महाराष्ट्र सरकारने मुंबईत जयंती सोहळा सुरू केल्यानंतर मी तेथील जयंत उत्सव बंद करून दिल्लीत घेण्याचा निर्णय घेतला. मी गेली पाच वर्षांपासून दिल्लीत अहिल्यादेवींची जयंती साजरी करतोय. प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो, त्यामुळे चौंडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार की नाही, याबाबत भाष्य करणे योग्य होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com