Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंची आक्रमक रणनीती; शिवसेनावाढीची प्रमुख चार नेत्यांवर सोपवली जबाबदारी

Satara shivsena News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिल्ह्यात एक लाख २० हजार इतक्या सक्रीय कार्यकर्त्यांची नोंदणी केली आहे. ही नोंदणी भाजप आणि काँग्रेसनंतरची तीन नंबरची आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara, 03 June : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची आक्रमक पद्धतीने बांधणी सुरू केली आहे. एकाच जिल्ह्यात दोनपेक्षा जास्त जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करत पक्षवाढीची जबाबदारी देताना प्रमुख कार्यकर्ते नाराज होणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यात शिवसेना वाढविण्याचे मोठे प्लनिंग शिंदेंनी केले आहे, त्यासाठी दोन जिल्हाप्रमुख नेमतानाच पक्षात योग्य समन्वय राहावा, यासाठी दोन प्रमुख नेत्यांवर समन्वयकाची जबाबदारी दिली आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापलिका निवउणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सातारा (Satara) जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांनी पक्षनोंदणीचा कार्यक्रम राबविला आहे. यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिल्ह्यात एक लाख २० हजार इतक्या सक्रीय कार्यकर्त्यांची नोंदणी केली आहे. ही नोंदणी भाजप आणि काँग्रेसनंतरची तीन नंबरची आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या नेतृत्वाची ही कामगिरी विशेष अशी ठरते.

पक्ष नोंदणीचा कार्यक्रम राबविल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर केल्या आहेत. साताऱ्यात दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी जिल्हाप्रमुख काम करणारे चंद्रकांत जाधव यांच्या सोबतीला रणजितसिंह भोसले यांची नियुक्ती केली आहे. चंद्रकांत जाधव यांच्या सलग तिसऱ्यांदा जिल्हाप्रमुखपद असणार आहे. त्यामुळे जुन्या जाणत्या अनुभवी जाधावांना आता भोसलेंची साथ असणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुखपदाच्या निवडी झाल्या आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुखांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि २०१६ पासून सलगपणे ते जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. २०२२ मध्ये शिवसेनेतील उठावानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.

Eknath Shinde
Hingoli Politic's : हिंगोलीत शरद पवारांना मोठा धक्का; निष्ठावंत अन्‌ वजनदार नेता करणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

दोन जिल्हाप्रमुखानंतर एकनाथ शिंदेंनी साताऱ्यात दोन जिल्हा समन्वयकाची नियुक्ती केली आहे. त्या दोघांवर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी असणार आहे. यामध्ये कऱ्हाडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव आणि युवा नेते विराज खराडे यांचा समावेश आहे. या दोघांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्षासाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

कऱ्हाड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष असलेले राजेंद्र यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शहराच्या विकासासाठी सुमारे तीनशे कोटींचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री देसाई व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून आणला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे.

Eknath Shinde
Solapur BJP : सोलापूरच्या नाराज देशमुखांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून भेटीचा निरोप; बावनकुळे, चंद्रकांतदादांच्या दौऱ्याकडे फिरवली होती पाठ!

शिवसेनेचे युवा नेते विराज खराडे यांनाही जिल्हा समन्‍वयकपदाची जबाबदारी दिली आहे. खराडे यांनी २००८ पासून शिवसेनेच्‍या उपजिल्‍हा प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली आहे. मुंबईतील सोहळ्यात त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्‍यानंतर पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्‍याने त्‍यांची समन्‍वयकपदी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com