अंबाजोगाई : राज्यभरात गाजत असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बनावट औषधी पुरवठा प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज अधिष्ठांताची भेट घेतली. या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना बनावट औषधी पुरवठा प्रकरणात तत्कालीन राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत, औषध प्रशान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सहआरोपी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बनावट औषधी पुरवठा प्रकरणाच्या चौकशीचा फार्स न करता बाह्य यंत्रणेकडून चौकशी करा. या यंत्रणेस जबाबदार धरून तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत, (Tanaji Sawant) अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करा, असेही अंधारे यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी बनावट औषधी प्रकरणी स्वा.रा.ती.चे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. (Dharmrao Baba Atram) त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत, धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर टीका केली. बनावट औषधांचे वाटप राज्यातील इतर अनेक रुग्णालयात झाले आहे.
असा औषध पुरवठा करून राज्य शासन हे सामान्यांच्या जीवाशी खेळत आहे. ही बनावट औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे गुजरात कनेक्शन आहे. ज्या कंपन्यांचा पत्ताच नाही, तर त्यांना औषधाचे टेंडर दिलेच कसे? असा प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केला. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतंत्र अन्न औषध खरेदी प्राधिकरण स्थापन केले. का व कशासाठी? औषधांचा काळाबाजार करण्यासाठीच की काय? असा आरोप करत या मार्फतच सर्व बनावट औषधीचे टेंडर झाले असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
या प्रकरणात तत्कालीन आरोग्यमंत्री व अन्न व औषध प्रशासन मंत्री यांना दोषी ठरवून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, असे म्हणत अंधारे यांनी तत्कालीन मंत्र्यांवर हल्ला चढवला. या बनावट औषध घोटाळ्याचा मुद्दा आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नावर वेळ पडली तर शिवसेना रस्त्यावरची लढाई ही लढणार असल्याचा इशारा अंधारे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.