Shivsena News : खातेवाटपावरून शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य; म्हणाले, 'मंत्रिपदाचे वाटप करताना...'

Mahayuti News : मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यातच भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मंत्रि‍पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.
Mahayuti News
Mahayuti NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानावर उत्साही वातावरणात पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता खातेवाटपात कोणाला काय मिळणार ? याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यातच भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मंत्रि‍पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. (Mahayuti News )

राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. त्यामुळे आता महायुतीच्या (Mahayuti) सरकारचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान केले आहे. येत्या काळात मंत्रिपदाचे वाटप करताना सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले.

Mahayuti News
Devendra Fadnavis : 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी...'; ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर शपथविधीनंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, "मी त्याचवेळी..."

सध्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असतानाच आता शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठे विधान केले आहे. येत्या काळात मंत्रिपदे देताना कसरत करावी लागणार असल्याचं विधान त्यांनी केले आहे.

Mahayuti News
Nana Patole : निमंत्रण दिले असते, तर शपथविधीला गेलो असतो; नाना पटोलेंची गुगली

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले आहेत, तर एकूण मंत्रि‍पदे 43 आहेत. त्यामुळे 43 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. त्यामुळे निश्चितच यामध्ये थोडी कसरत करावी लागणार आहे. त्यामध्ये अनेक सीनियर आमदार आहेत, अनेकांचा अनुभव आहे. या सर्वांचा ताळमेळ बसवण्यासाठी नेत्यांना कौशल्य दाखवावे लागणार आहे, असेही यावेळी संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

Mahayuti News
Mahayuti News : शपथविधीनंतर आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग; 'या' खात्यासाठी मोठी रस्सीखेच

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गृहखात्यावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही आहेत, तर भाजप गृहखाते सोडण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता यासंदर्भातील निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगत गृहखाते कोणाकडे असेल? यावर आमचे वरिष्ठ निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Mahayuti News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय; 'या' तीन विद्यमान मंत्र्यांचा होणार पत्ता कट?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com