Manoj Jarange patil
Manoj Jarange patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange News : '13 तारखेपर्यंत मराठे चांगले होते, त्यानंतर वाईट झाले का?' ; मनोज जरांगेंचा सवाल!

Jagdish Pansare

Manoj Jarange Vs OBC News : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीयवाद झाल्याच्या आरोपावरून वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना जिल्ह्यात येऊ न देण्याच्या धमकी प्रकरणानंतर हे प्रकरण अधिक चिघळले.

यावरून जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे(Dhananjay Munde), पंकजा मुंडे असा वाद सुरू झाला. यावर जरांगे पाटील यांनी मतदान होईपर्यंत म्हणजेच 13 तारखेपर्यंत मराठे चांगले होते, त्यानंतर ते वाईट झाले का? असा सवाल उपस्थित केला आहे. मराठा समाजावरील अन्याय थांबवायाचा असेल तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे, असे आवाहन करत जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावण्याचे संकेत दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत घरी बसवा, ते निवडून गेले तर आपल्या मागणीला विरोध करतील, असेही मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले. बीड जिल्ह्यात विशेषतः परळीमध्ये मोठ्या प्रमाणात जातीयवाद केला जात आहे, मराठा समाजाच्या लोकांच्या दुकानातून वस्तू खरेदी करू नका, त्यांच्यावर बहिष्काराची भाषा केली जात आहे, असा आरोप केला जातो.

संताची भूमी असलेल्या बीड(Beed) जिल्ह्यासाठी ही भूषणावह बाब नाही. महाराष्ट्रात, मराठवाड्यात असे कधी घडले नव्हते. आम्ही कधीच अमूक एखाद्या समाजाच्या दुकानात जाऊ नका, असे म्हणणार नाही. निवडणुकीत मराठा समाजाने तुमचं काम केल, कुठेही जातीयवाद केला नाही अन् तुम्ही आम्हालाच जातीयवादी ठरवतायेत. पण माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे शांत राहा. आपण फक्त कोण काय करतंय याच्यावर लक्ष ठेवायचं. महिनाभरानंतर काय करायचं ते ठरवू, असा सूचक इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

आंदोलन हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण काही मंडळी राजकीय हेतून आमचे आंदोलन आणि त्याचा संबंध जातीशी जोडत आहेत. आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, हक्कासाठी आम्ही शांततेत लढत आहोत. आम्हाला शांत राहू द्या, जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मराठा समाजाला केले.

त्यांच काम होईपर्यंत ते सगळ्यांच्या पाया पडले. मात्र, शेवटी एक पर्याय आहे, अन्याय रोखण्यासाठी सत्तेत जावं लागेल, अस म्हणत जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. सरकारने दिलेला शब्द पाच महिने होऊन गेले तरी पाळला नाही, त्यामुळे चार जून रोजी आंदोलन करणारच, असेही जरांगे यांनी ठामपणे सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT