Manoj Jarange Patil News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : अटकेची मागणी करणाऱ्या आमदार अभिमन्यू पवारांना जरांगे पाटलांनी सुनावले

Maratha Reservation : निलंग्यातील संवाद सभेत मनोज जरांगे पाटील यांनी खास आठवण ठेवून अभिमन्यू पवार यांचा समाचार घेतला.

राम काळगे

Nilanga Political News : संवाद दौऱ्याच्या निमित्ताने मराठवाडा आणि राज्यभरात सुरू असलेल्या दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या समर्थनात भाजपसह महायुतीतील अनेक नेते, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री मैदानात उतरले होते. अनेकांनी तर मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणीही केली होती. त्यापैकीच एक म्हणजे औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार.

निलंग्यातील संवाद सभेत बुधवारी (ता.13) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी खास आठवण ठेवून अभिमन्यू पवार यांचा समाचार घेतला. ज्यावेळी कारखान्याच्या गळीत हंगामात मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाला. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार होते. परंतु, सकल मराठा समाजाने आरक्षण मिळाल्याशिवाय लोकप्रतिनीधीना बंदी करू, असा इशारा दिला. तेव्हा अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) माझ्याकडे येऊन सकल मराठा समाजाला सांगावे म्हणून आला होता. त्यावेळी मी शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे, होऊ द्या म्हणून सांगितले.

अंतरवाली सराटी येथे उपोषण दरम्यान मनोज जरांगे-पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना सागर बंगल्यावर येतो मला गोळ्या घाला म्हणून मुंबईच्या दिशेने निघाले होते. यावेळी महाराष्ट्रातील अनेक भाजपा आमदार थेट मनोज जरांगे-पाटील यांना आव्हान देत मीडियाच्या माध्यमातून इशारे देत होते. विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाची एसआयटी चौकशीही लावण्यात आली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट मनोज जरांगे-पाटील यांना अटक करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर सोशल मिडियावर मराठा समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आज निलंगा येथील संवाद सभेत मनोज जरांगे पाटील यांनी अभिमन्यू पवार यांनी केलेल्या अटकेच्या मागणीवरून त्यांच्यावर टीका केली. समाज महत्त्वाचा आहे पक्ष नंतर आहे. जे कोणी लोकप्रतिनीधी समाज व जातीपेक्षा पक्षाला महत्त्व देतील त्यांची समाज गय करणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT