Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : 'आरक्षणाच्या विरोधात बोलला तर वाजवीलच' ; जरांगेंचा भुजबळांना शेलक्या शब्दात इशारा!

Manoj jarange Latest Speech : भुजबळांच्या उपरोधिक टीकेवर जरांगेचा अप्रत्यक्ष इशारा...

Chetan Zadpe

Parbhani News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेले मनोज जरांगे-पाटील यांची मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात सेलू येथे विराट सभा झाली. या सभेसाठी मराठा समाजाने प्रचंड गर्दी केली होती. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण मिळवणारच, अशी ग्वाही देत सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

मनोज जरांगे-पाटील सभेत बोलत असताना उपस्थित जनसमुदायाकडून भुजबळांच्या विरोधात घोषणा होऊ लागल्या. भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी झाल्यानंतर जरांगे म्हणाले, 'मी असल्यांवर आता बोलत नाही. कसल्यांचंही नाव मी घेत नाही. पण आता मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललात तर याला वाजवीलच. आता तर सुट्टीच नाय, अशा शेलक्या शब्दात जरांगेंनी भुजबळांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

भुजबळ काय म्हणाले होते?

जरांगेचं म्हणणं सरकारनं ऐकलं पाहिजे. जे सोयरे आहेत, पत्नीचे आईवडील, त्यांची मुलं, व्याह्यांचे व्याही...त्या व्याह्यांचे व्याही... अशी जी सर्व साखळी आहे त्या सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे. आपण जरांगेचं ऐकलं पाहिजे, नाही तर ते मोर्चा घेऊन येतील, खोचक टोला भुजबळांनी लगावला होता.

सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटण्यासाठी जाते, यावरून भुजबळांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. 'मंत्री सारखे सारखे तिकडे जातात, त्यापेक्षा दोन-चार बंगले, चीफ सेक्रेटरीचं कार्यालय, अंतरवाली सराटीत उभारा, म्हणजे त्यांनी सांगितलं की लगेच जीआर काढता येईल. जाण्या-येण्याचा त्रास वाचेल. जरांगेंच्या मनात अभिनव कल्पना येत असतात. मग मंत्री त्यांच्याकडे जातात, त्यापेक्षा आपलेच मंत्री तिथे राहिले तर बरं होईल', असा टोला भुजबळांनी लगावला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT