Manoj Jarange Patil News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : 'मी तडफडून मरायला तयार आहे पण...' ; जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा ललकारले!

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : "दहा टक्के आरक्षण एवढे तुटपुंजे आरक्षण..."

Chetan Zadpe

Jalna News : मराठा आरक्षण आंदोलन 3 मार्च पर्यंत स्थगित केल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप काढून टाकण्यासाठी सरकारकडून दडपशाही सुरु असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे. दहा टक्के आरक्षण एवढे तुटपुंजे आरक्षण आम्हाला नको आहे. जेलमध्ये टाकलं तरी मागे हटणार नाही, असाही जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "सरकारने ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचेही कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्याचे बंद केले आहे. हायकोर्टाच्या तारीख ३ मार्च असताना अलीकडे घेतली आणि तिथे गृहमंत्र्यांनी दगाफटका केला. न्यायालयाने सांगितलं होतं की, शांततेत रास्ता रोको करा, तो अधिकार आहे तुमचा. त्याप्रणाणे आम्ही आंदोलन केलं. मात्र गृहमंत्री फडणवीसांनी गुन्हे दाखल केले, आपल्यावर जाणुनबुजून अन्याय केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सरकारचं म्हणणं आहे की, आम्ही 10 टक्के आरक्षण स्वीकारावं. हे आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे आहे त्यांनी घ्यावं. आमची काही जोर - जबरदस्ती नाही. पण मराठा समाजाची मागणी आहे ते ओबीसीतून (OBC) आरक्षण. मी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. जेलमधून टाकून त्यांनी मला सडवलं तरी मी मागे हटणार नाही. मी समाजासाठी तडफडून मरायला तयार आहे, पण मी मागे हटणार नाही," असे जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT