Manoj Jarange On OBC Reservation  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange On OBC Reservation : ओबीसींना जास्तीचं मिळालेलं आरक्षण घटनाबाह्य; जरांगे पाटील कडाडले!

Chetan Zadpe

Manoj jarange Patil On OBC Reservation - ओबीसींना (इतर मागासवर्गीय समाज) जास्तीचं आरक्षण मिळालं आहे आणि त्यांना मिळालेलं आरक्षण घटनाबाह्य आहे. मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसींना १४ टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, ओबीसींना १४ टक्क्याच्यावर मिळालेलं आरक्षण हे घटनाबाह्य आहे, असंही जरांगे यांनी सांगितलं. (Latets Marathi News)

जरांगे पाटील म्हणाले, "ओबीसींना मिळालेलं आरक्षण हे घटनाबाह्य आहे. तुम्ही ओबीसींना जे जास्तीचं आरक्षण दिलं, हे कोणत्या आधारावर आणि निकषावर दिलं. जर तुम्हाला (ओबीसी) आयोगाने कायदेशीर आणि लोकशाही मार्गानं मंडल कमिशन स्थापन केलं होतं. मंडळ कमिशनने १४ टक्के आरक्षण दिलं होतं. यावर दिलं गेलेलं १६ ते १७ टक्के आरक्षण हे घटनाबाह्य आहे. "

जरांगे पाटील म्हणाले, "ओबीसी नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही. आपल्या गोरगरीब मुलांचं कल्याण होतंय, हे मराठा समाजाला माझं आवाहन आहे. ओबीसी बांधवही आमच्या सोबत आहेत. पण ओबीसींमधील दोन-तीन नेत्यांना मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी एकजूट वाढवावी, पण शांततेत. आणि आता जाणूनबुजून षडयंत्र रचलं जात आहे. महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनी हे लक्षात घ्यावं."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT