Gram Panchayat Results : भाजप-काँग्रेस युतीने केला बबनदादा शिंदेंच्या पॅनेलचा 'करेक्ट कार्यक्रम'...

Tembhurni Gram Panchayat Election : माढा तालुक्यातील सर्वांत मोठ्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर फडकला भाजपचा झेंडा
Tembhurni Gram Panchayat Results
Tembhurni Gram Panchayat ResultsSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या युतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार बबनराव शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलचा दणदणीत पराभव करत माढा तालुक्यातील सर्वांत मोठ्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. भाजप-काँग्रेसच्या या अनोख्या युतीने टेंभुर्णी ग्रामपंचायतीमध्ये तब्बल १५ वर्षांनंतर सत्ता परिवर्तन केले आहे. सत्ताधारी प्रमोद कुटे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. (BJP wins in Tembhurni gram panchayat, the largest in Madha taluka)

टेंभुर्णी ग्रामपंचायतीसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बोबडे यांनी आघाडी केली होती. त्या आघाडीने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या आमदार शिंदे गटाला निवडणुकीत धूळ चारली आहे. बोबडे यांच्या पॅनेलने माढ्याच्या सरपंचपदासह ग्रामपंचायतीच्या १६ पैकी दहा जागांवर भाजपचे सदस्य निवडून आणले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tembhurni Gram Panchayat Results
Barshi Politics : बार्शीत सोपल-राऊत गटात अटीतटीचा सामना; दोन्ही गटांकडून पाचही ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा

आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक असलेले रावसाहेब देशमुख आणि प्रमोद कुटे यांच्या पॅनेलला निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. निकालात रावसाहेब देशमुख गटाला सहा, तर प्रमोद कुटे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार सुरजा बोबडे या मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.

टेंभुर्णी हे पुणे-सोलापूर महामार्गावरील माढा तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. मोठ्या बाजारपेठेमुळे उलाढाल मोठी असते, त्यामुळे ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वपक्षीयांमध्ये चढाओढ असते. तालुक्यातील तुळशी, पिंपळनेर, अंजनगाव (खेलोबा), अंबाड, लोणी-नाडी या ग्रामपंचायतीवर आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजय शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व राखले आहे. मात्र, आमदार शिंदे यांनी टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या वेळी कसल्याही प्रकारचे लक्ष घातले नव्हते.

Tembhurni Gram Panchayat Results
Solapur Gram Panchayat Result : सोलापुरात पुन्हा कमळ फुलले; ४९ ग्रामपंचायतींवर सत्ता, १४ ठिकाणी अजितदादांचा झेंडा

चांदजमध्ये शिंदे गटाचा गड आला; पण सिंह गेला...

चांदज ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत नऊ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक सहा जागा जिंकल्या असल्या तरी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांची अवस्था 'गड आला; पण सिंह गेला' अशी झाली आहे. सरपंचपदी भाजप-शिवसेना शिंदे गट पुरस्कृत आघाडीच्या शोभा टकले ५७ मतांनी निवडून आल्या. सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी संचालक शिवाजीराव पाटील यांच्या आमदार बबनराव शिंदे ग्रामविकास पॅनेल, तर रामचंद्र टकले आणि निवृत्ती तांबवे यांच्या भाजप-शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनेल यांच्यात दुहेरी लढत होती.

Tembhurni Gram Panchayat Results
Gram Panchayat Election Results : नारायण पाटलांनी ३० वर्षांची सत्ता राखली अन्‌ मुलाला सरपंचही केले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com