Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी मागितली देवेंद्र फडणवीसांची माफी...

Amol Sutar

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकारण फरच खालच्या पातळीवर गेल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आई - बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा निघाला. यावरुन जरांगेंनी आज आई - बहिणीवरून कोणाला काही बोललो असल्यास मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागत असल्याचे सांगत दिलगीरी व्यक्त केली आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarenge) यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून सगेसोयऱ्यांसह आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आमरण उपोषण केले. याबाबत सरकारने अधिसूचना देखील काढली. मात्र सगेसोयऱ्यांच्या मागणीच्या अंमलबजावणीवरुन जरांगे आक्रमक झाले. यात त्यांची जीभ घसरली. काल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आई-बहिण काढली.

जरांगेंच्या या भाषेवरुन फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर मंत्री चांगलेच आक्रमक झाले. हा मुद्दा आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चर्चेला आला. तसेच जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी देखील फडणवीस यांनी सभागृहात केली. त्यामुळे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मनोज जरांगे यांच्यावरुन चांगलेच वातावरण तापले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिलगिरी केली व्यक्त...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेच्या पटलावर छत्रपती शिवरायांचे नाव घेत त्यांच्या काळात असं होतं का? आई - बहिणीवरून बोलणं योग्य आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. ते मी पण ऐकले आहे, असल्याचे जरांगे यांनी सांगितले. यावरुन ते म्हणाले, जनतेला मी मायबाप मानतो आणि अनावधानाने माझ्याकडून शब्द गेले असतील. कारण माझ्या पोटात सोळा - सतरा दिवस झाले अन्नाचा कण नव्हता. त्यामुळे मी माझ्या माता माऊलीला मानतो जर आई-बहिणीवरुन माझ्याकडून शब्द गेले असतील तर मी मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. मी त्या छत्रपतींच्या विचारावरच चालतोय त्यामुळे मी मागे सरकणार आहे, असेही जरांगे म्हणाले...

आंदोलन सुरुच राहील...

इंटरनेट सेवा बंद करणे, संचारबंदी लागू करणे, लोकांत काहीतरी वातावरण पसरवून देणे, ही सगळी देवेंद्र फडणवीस यांची किमया आहे. परंतु मी ते घडू देणार नाही. मात्र कायमस्वरूपी म्हणजे जोपर्यंत सगेसोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे सुरु राहील, असा इशारा यावेळी मनोज जरांगेंनी दिला.

एसआयटी चौकशीबाबत जरांगे म्हणाले, त्यांना माझ्या काय चौकश्या करायच्या असतील त्यांनी त्या बिनधास्त कराव्या. एसआयटीची चौकशी सुद्धा बिनधास्तपणे चालू द्यावी, त्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही. सगळ्या यंत्रणा त्यांच्याच आहेत, त्यांना त्या कशा चालवायच्या आहेत, काय धाक दाखवायचे ते दाखवा. मात्र मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये सडायला तयार आहे आणि लढायला पण तयार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT