Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या रोषामुळे भाजपच्या 'या' आमदाराने गावातून काढता पाय घेतला!

Maratha Reservation Protestors : जाणून घ्या कुठे घडली घटना आणि कोण होते ते आमदार?

Mayur Ratnaparkhe

Nanded News : मराठा आरक्षणा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. मनोज जरांगे यांनी बीड येथील इशारा सभेतून मराठा समाजाला चलो मुंबईची हाक दिली आहे आणि 20 जानेवारीपासून ते मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू करणार आहेत. कारण, या अगोदर मनोज जरागेंनी मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत संपली आहे. त्यामुळे आता मराठा समाजातही संतापाचे वातावरण आहे.

दरम्यान मराठा समाजाच्या रोषाचा फटका भाजपचे(BJP) विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांना बसला आहे. मराठा समाजाच्यावतीने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलेली असताना, आमदार गावात कसे काय आले? असा प्रश्न विचारत मराठा समाजातील तरुणांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर काहींनी त्यांच्या वाहनावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेवटी परिस्थिती अधिकच चिघळत असल्याचे पाहून आमदारांनी गावातून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दत्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आमदार रातोळीकर आपल्या कार्यकर्त्यांसह नांदेड जिल्ह्यातील कामठा खुर्द या गावात पोहचले होते. त्यांना पाहून मराठा आंदोलक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. आमदारांना मंदिरात जाऊन दर्शन घेऊ दिले, मात्र त्यानंतर त्यांना तिथे थांबू दिले नाही.

मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत धडक देण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे-पाटील(Manoj Jarange) यांची जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज भेट घेतली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT