Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation Update : मनोज जरांगे सरकारला पुन्हा झुकवणार?, आजपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण

Manoj Jarange Patil News : सरकारने मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर तसेच नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांवर चर्चा होईल.

Roshan More

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुंबई आंदोलनासाठी गेलेल्या मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य करत 'सगेसोयरे' शब्दावर तोडगा काढत अधिसूचना काढली. सरकारचा निर्णय मान्य करत जरांगे यांनी त्यांचे आंदोलन वाशीमध्ये स्थगित केले होते. पण, सरकारने काढलेल्या अधिसूचनेचा कायदा व्हावा म्हणून आजपासून (शनिवार) मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण करणार आहेत. Maratha Reservation Update

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) उपोषणावर ठाम आहेत. आज सकाळी 10 वाजता बैठक घेतील. या बैठकीनंतर आपण उपोषण सुरू झाल्याची घोषणा करतील. सरकारने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर तसेच नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांवर चर्चा होईल. त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. पण सरकारच्या अधिवेशनाला पाच दिवस बाकी असताना मनोज जरांगे आज (शनिवार) पासून उपोषण सुरू करणार आहेत.

राज्य सरकारने 15 फेब्रुवारीला मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वे केला होता. तब्बल 90 टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. सर्वेक्षणामध्ये संकलित केलेल्या माहितीचे आधारे राज्य सरकार विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणा नवीन कायदा किंवा आणखी काही मार्ग आहेत का, आदी पर्यायांची तपासणी सरकार करण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दोन दिवस आधीच नाशिक जिल्ह्यात दौरा केला. या दौऱ्यात जरांगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.त्यांनी आपल्या दौऱ्यात जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली. काही लोकांना पैसे देऊन मंत्र्यांनी न्यायलयात आरक्षणाच्या विरोधात याचिक दाखल करण्यास सांगितले, असे दावा देखील जरांगे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT