Chhagan Bhujbal Sarkarnaa
मराठवाडा

Chhagan Bhujbal : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा 'एल्गार', प्रकाश आंबेडकर यांना ही निमंत्रण...

OBC Vs Maratha : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतांना अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते.

Laxmikant Mule

Marathwada OBC News : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सुरू असलेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष काही केल्या थांबायला तयार नाही. मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी 'आरपार'ची लढाई सुरू केली आहे. तर, दुसरीकडे महायुती सरकारमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना आव्हान देत त्यांच्या मागणी विरोधात एल्गार पुकारला आहे.

राज्यभरात ओबीसींचे मेळावे घेत छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला तीव्र विरोध सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता.7) नांदेडमध्ये छगन भुजबळांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा होणार आहे. माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे वर्चस्व असलेल्या नांदेडात छगन भुजबळ एल्गार मेळावा घेत असल्याने याची विशेष चर्चा होत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतांना अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते.

तेव्हा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे सरकार काहीही करू शकत नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली होती. मात्र सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मात्र अशोक चव्हाण यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका करत मराठा आरक्षणावर ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ अशोक चव्हाणांवर काय बोलतात? याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील विविध भागात सकल ओबीसींच्या वतीने आरक्षण बचाव अभियान राबविण्यात येत आहे. ओबीसींच्यावतीने नरसी येथे उद्या, रविवारी (ता 7) रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असून उद्या नांदेड जिल्ह्यात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

याशिवाय जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, ओबीसी नेत्यांनी तालुका, छोट्या मोठ्या गावात जाऊन बैठका,सभा घेतल्या. सभेसाठी सुमारे 25 ते 30 एकरचे मैदान तयार करण्यात आले आहे. ही एल्गार सभा सकाळी अकरा वाजता होणार असून प्रकाश आंबेडकर यांच्यासह प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, टी. पी. मुंडे यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT