Yavatmal : असंवेदनशीलतेचा कळसच! मृतक, जखमी, पोलिस वाऱ्यावर; भोंडेकर हार-तुऱ्यात मग्न

Narendra Bhondekar : पळालेल्या आमदारांनी मृतकाच्या कुटुंबाचे साधे सांत्वनही केले नाही...
MLA Bhondekar In Public Functions.
MLA Bhondekar In Public Functions.Sarkarnama
Published on
Updated on

Insensitivity Of Public Representative : भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी असंवेदनशीलपणाचा कळस गाठला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसजवळ झालेल्या अपघातातील जखमी आणि पोलिसांना वाऱ्यावर सोडून देत ‘व्हीआयपी कॉनवॉय’मध्ये आपले ‘होमटाऊन’ गाठलेल्या भोंडेकर यांनी आराम फर्मावल्यानंतर शनिवारी (ता. 6) पक्षप्रवेश आणि हार-तुऱ्यांच्या कार्यक्रमांमध्ये आपला दिवस व्यतित केला.

अपघातातील गंभीर जखमींना दोन वाहने असतानाही रक्ताच्या थारोळ्यात पडून राहू देत पलायन करणाऱ्या भोंडेकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसजवळच्या अपघातात मरण पावलेल्या गजानन जकाते यांच्या कुटुंबाला साधा सांत्वनपर फोनही केला नाही.

MLA Bhondekar In Public Functions.
Yavatmal : आमदार भोंडेकरांनी पळण्याऐवजी मदत केली असती, तर एक जीव वाचला असता!

‘माझ्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनामुळे का होईना, आपल्या कुटुंबातील एका सदस्याचा प्राण गेला. हा अपघात होता. कुणी हे जाणिवपूर्वक केले नव्हते. तरीही मी आपल्या दु:खात सहभागी आहे. आपल्या कुटुंबातील सदस्याची उणीव या शब्दाने भरून काढता येणार नाही; परंतु झालेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त करतो,’ असे दोन शब्द फोनवर बोलण्याचे साधे सौजन्यही संवेदनशील असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या या शिलेदाराने दाखविलेले नाही.

मृतकाच्या परिवाराचे सांत्वन आणि जखमींची विचारपूस करण्याऐवजी आमदार नरेंद्र भोंडेकर शनिवारी सकाळपासूनच पक्षप्रवेश, स्वागत, हार-तुरे, सत्कार यातच ‘बिझी’ होते. प्रहार जनशक्ती पार्टीवर तुळशीपत्र ठेवत शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छुक आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांचा पक्षप्रवेश आमदार भोंडेकर यांनी करून घेतला. त्यानंतर ते शहरातील काही समारंभांमध्ये सहभागी झाले. या समारंभांमध्ये हार-तुरे, स्वागत स्वीकारण्यात ते व्यस्त होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरातील या समारंभांपैकी एकात भाषणबाजी करताना आमदार भोंडेकर यांनी समाजाला सकारात्मकतेची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन केले. उपस्थितांना सकारात्मकतेचे महत्त्व सांगणाऱ्या भोंडेकरांनी मात्र अपघातातील जखमी व आपल्याच अंगरक्षकांप्रती दाखविलेल्या नकारात्मकतेबद्दल मात्र ते गेल्यानंतर खमंग चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

भोंडेकर यांचे स्वीय सहायक संजय शेकोकर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. शेकोकर परिवारातील चौदावीच्या कार्यक्रमासाठी ते शुक्रवारी दिग्रस येथे आले होते. त्यांच्या ताफ्यात असलेल्या भंडारा पोलिसांचे ‘एस्काॅर्टिंग’ वाहनाची ऑटो व दुचाकीला जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अशात दोन वाहने असतानाही आमदार नरेंद्र भोंडेकर जखमींना रक्ताच्या थारोळ्यात आणि अंगरक्षक पोलिसांना चौकशी, कारवाईच्या ससेमिऱ्यासाठी टाकून देत सायरनवाल्या ‘पायलटिंग कार’सोबत पुढे निघून गेले.

MLA Bhondekar In Public Functions.
Yavatmal : अपघातानंतर आमदार भोंडेकर पळाले अन‌् पोलिसही; एफआयआरही नाही

आमदाराने दाखविलेल्या या असंवेदनशीलतेबद्दल यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यवतमाळ आणि दिग्रसमध्ये तर आमदार भोंडेकर यांच्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. मृतक गजानन जकाते आणि जखमींच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये शोक व संतापाचा आक्रोश सुरू असताना भोंडेकर सुवासिक फुलांचे पुष्पहार गळ्यात घालून घेत आहेत.

‘व्हीआयपीं’ची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांनाही वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना असावी. सुरक्षा ताफ्यातील एकूण पाच पोलिसांना भोंडेकर हे सोडूनही आलेत. या पोलिसांनीही ‘साहेब गेले आणि आम्हाला मार खायला सोडून गेले...’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. शासकीय राजशिष्टाचार आणि खाकीची शिस्त आडवी येत असल्याचे उघडपणे बोलता येत नाही, असेही काहींनी सांगितले.

Edited by : Atul Mehere

R...

MLA Bhondekar In Public Functions.
Yavatmal : ‘वाय’ सुरक्षा असलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या ताफ्यातील अपघातावर शंकांचे वलय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com