Chhagan Bhujbal  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation: शिंदे समिती रद्द करा; छगन भुजबळांची मोठी मागणी

Chhagan Bhujbal VS Manoj Jarange Patil: "गेल्या दोन महिन्यात मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले ते रद्द करा", भुजबळांची मागणी

Ganesh Thombare

Hingoli News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट कणबी प्रमाणपत्र देण्यास मंत्री छगन भुजबळांनी विरोध केला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मंत्री भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. भुजबळांची रविवारी हिंगोलीत सभा पार पडली. या सभेत बोलताना राज्य सरकारने स्थापन केलेली शिंदे समिती रद्द करण्याची मोठी मागणी त्यांनी केली. भुजबळांच्या या मागणीमुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावर मराठा समाज मागास ठरवण्यासाठी राज्य सरकारने शिंदे समितीची स्थापन केलेली आहे. ही समिती सध्या यासंदर्भात काम करत आहे. मात्र, अशातच मंत्री भुजबळांनी थेट शिंदे समितीच बरखास्त करण्याची मागणी हिंगोलीतील सभेत बोलताना केली आहे.

या बरोबरच गेल्या दोन महिन्यात मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले ते रद्द करा, तसेच सर्वांची जनगणना करा, सर्वांचाच सर्व्हे करा, मग त्यानंतर मागासलेपण ठरवा, अशा मोठ्या मागण्या भुजबळांनी सरकारकडे केल्या आहेत.

दरम्यान, हिंगोलीतील सभेत बोलतानाच छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देत "माझे जेवढे केस पिकले, तेवढे आंदोलने मी केली आहेत", असा खोचक टोला लगावला. तर मंत्री भुजबळांच्या शिंदे समिती बरखास्त करण्याच्या मागणीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT