Raviraj Sable Sarkarnama
मराठवाडा

Raviraj Sable death threat : मराठवाड्यात सतीश चव्हाणांना घरी बसवायला मदत करणाऱ्या रविराज साबळेंना धमकी

Independent candidate Raviraj Sable alleges death threat from Shiv Sena leader after questioning MLA Tanaji Sawant over drought relief and farmers issues : दुष्काळातील मदतीच्या जाहिरातबाजीवरून आमदार सावंतांना जाब विचारल्याचा राग? शिंदेसेनेच्या तालुकाप्रमुखाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा साबळेंचा आरोप; 'धमक्या देण्यापेक्षा मतदारसंघात काम करा' असा टोला.

Pradeep Pendhare

Raviraj Sable threatened to kill : मराठवाडा पदवीधर संघाच्या निवडणुकीत प्रस्थापितांना घाम फोडणारे, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, कृषी उद्योजक आणि अपक्ष राजकारणी रविराज साबळे यांना एकनाथ शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुखाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

रवीराज साबळे यांनी यावरून, आमदार तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, या धमकी प्रकरणावर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, ती दाखल झाल्याचे वृत्त नव्हते.

रविराज साबळे यांना काल दुपारी भूम-परड्यांचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे तालुकाप्रमुखांनी फोन करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. दुष्काळाच्या काळात मदतीच्या नावाखाली जाहिरात बाजी केली जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रविराज साबळे यांनी म्हटले होते की, दुसऱ्या टर्मला आमदार झाला आहात. धूम-परंड्यामध्ये पाणी फिरवणार होतात. शेत परिसर पाणीदार करणार होतात. त्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्न होतात. त्याच्याबदल्यात पाच किलो साखर देताय. ही शेतकऱ्यांची थट्टा नाही का? त्याचा राग धरून, मला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली.

धमक्यांची ही पहिली-दुसरी वेळ नसून, यापूर्वी चार वेळा असे झालेले आहे. शिवसेनेच्या (Shivsena) तालुकाप्रमुखाने ही धमकी कोणाच्या पाठबळावर दिली आहे? प्रशासन काय करत आहेत? सत्ताधाऱ्यांना प्रश्न करणे चुकीचे आहे का? आमदार महोदयांना राग येत असेल, सत्ताधाऱ्यांनी लोकशाही ठेवली आहे काय? असे प्रश्न आलेल्या धमकीवरून रवीराज साबळे यांनी उपस्थित केले आहेत.

आमदार तानाजी सावंत यांना सल्ला देताना, रविराज साबळे यांनी, आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापेक्षा मतदारसंघात काम करणे गरजेचे आहे, असा टोला लगावला. शेवटी आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पूर्वी देखील ते घरापर्यंत पोहोचले होते. आता सुद्धा घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा पुनरूच्चार रविराज यांनी केला. रविराज साबळे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

नुकताच झालेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रविराज साबळे अपक्ष म्हणून समोरे गेले होते. या निवडणुकीत त्यांनी सुमारे 19 हजार 835 मते मिळवून 'जायंट किलर'ची भूमिका बजावली आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले होते. महायुतीचे उमेदवार गेली तीन टर्म मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणारे सतीश चव्हाण यांच्या पराभवाला रविराज साबळे यांनी घेतलेल्या 19 हजार 835 मतांचा मोठा वाटा आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील यांनी सतीश चव्हाण यांचा 18 हजार 124 मतांनी पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT