Dhananjay Deshmukh Beed Sarkarnama
मराठवाडा

Massajog Gram Panchayat Election News : मी उमेदवार नाही, मा‍झ्या वहिनीला सरपंच पदाचा अनुभव, त्यांची निवड बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न!

Santosh Deshmukh murder News : गावातील आजी-माजी सदस्य, पॅनल प्रमुखांची या संदर्भात बैठक झाली असून एक-दोन दिवसात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सांगितले.

Jagdish Pansare

Beed Politics News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी निवडणूक न होता ही निवड बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. गावातील आजी-माजी सदस्य, पॅनल प्रमुखांची या संदर्भात बैठक झाली असून एक-दोन दिवसात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सांगितले.

संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांनी गावचा कारभार ज्या चांगल्या पद्धतीने सांभाळला होता, जी कामे केली होती, तशीच यापुढे सुरू राहावी, अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. देशमुख कुटुंबातील व्यक्तीच सरपंच पदावर असावी, असाही मतप्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांच्या निर्णायाची आम्ही वाट पहात आहोत, दोन तीन दिवसात ठोस निर्णय होईल, असे म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंचाचे निधन, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त 88 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे. आजपासून उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 13 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 29 एप्रिल रोजी मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

सव्वा वर्षापुर्वी खंडणी प्रकरणातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याचे मोठे राजकीय पडसादही बीड जिल्ह्यात आणि राज्यात उमटले होते. सरपंच संतोष देशमुख यांचा दीड वर्षाहून अधिकचा कार्यकाळ शिल्लक होता. आता सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

उर्वरित काळावधीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाच बिनविरोध सरपंच करण्याचा प्रयत्न गामस्थ करत आहेत. ही निवड बिनविरोध होणे हीच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली ठरेल, असे सगळ्यांचे मत बनले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गावाच्या विकासासाठी टीम वर्कची गरज असते.

दिवंगत संतोष देशमुख यांनी पंधरा वर्ष गावासाठी घातले आहेत. या निवडणुकीसाठी शक्यतो मी उमेदवार नाही. माझ्या वहिनीला सरपंचपदाचा आणि बाजार समितीच्या सदस्यपदाचा अनुभव आहे. त्यांना विचारात घेऊन गावकऱ्यांनी बैठक घेतलेली आहे. येत्या एक-दोन दिवसात निवडणूक बिनविरोध कशी होईल? हा गावकऱ्यांचा प्रयत्न असेल, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.

माझ्यासाठी संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची आहे. मला केसला वेळ द्यायचा आहे, मला कुठलाही दबाव नाही, मला कुठली अपेक्षा नाही आणि भीतीही नाही. येत्या दोन-तीन दिवसात आम्ही सर्वजण बसून तोडगा काढणार आहोत. देशमुख कुटुंबावर आलेले संकट कुणी संधी म्हणून बघू नये. उरलेल्या कालावधीत संतोष अण्णांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आमचे ध्येय असल्याचे देशमुख म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT