Santosh Bangar, Dhananjay Munde, Eknath Shinde sarkarnama
मराठवाडा

Hingoli News : पीकविम्यावरून आमदार बांगर आक्रमक; कृषी अधीक्षकांना भरला दम

Santosh Bangar हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यावरून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आक्रमक झाले होते.

Umesh Bambare-Patil

Hingoli Shivsena News : हिंगोलीत पीकविम्याच्या प्रश्नावरून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कृषी विभागाच्या कार्यालयात दाखल होत कृषी अधीक्षकांना चार दिवसांत शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे खात्यावर जमा करा, अन्यथा,माझ्या एवढा वाईट कोणी नाही, असा सज्जड दम दिला आहे.

हिंगोलीचे कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांच्या आडमुठेपणामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पीकविमा कंपनीकडून नाकारण्यात आली आहे, असा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

यावरून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आक्रमक झाले होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कृषी विभागाच्या कार्यालयात दाखल झाले. आमदार बांगर यांनी कृषी अधीक्षकांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे खात्यावर जमा करा, अन्यथा माझ्या एवढा वाईट कोणी नाही, असा सज्जड दम दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, चार दिवसांत खात्यावर पैसे मिळाले नाही तर हिंगोलीच्या कृषी कार्यालयात शिवसेनेच्या स्टाइलने आंदोलन करू, असेदेखील बांगर या वेळी म्हणाले. विशेष म्हणजे शिवसेना आमदार संतोष बांगर हे सत्ताधारी आमदार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून बांगर यांची ओळख आहे. मात्र, तरीदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार बांगर विरोधी पक्ष नेत्याप्रमाणे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT