MLA Santosh Bangar
MLA Santosh BangarSarkarnama

Santosh Bangar News : मिशी, फाशी अन् रडारड; बहुरूपी आमदार संतोष बांगर...

Marathwada Shivsena News : गळफास घेण्याच्या चॅलेंजमुळे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत आले आहेत...
Published on

Hingoli News : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे कायम चर्चेत असतात. बाळासाहेबांचा शिवसैनिक असं मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या बांगर यांनी आपल्या तडाख्याने अनेकांना सरळ केले. त्यांच्या या आक्रमकपणामुळे त्यांच्या अडचणीत अनेकवेळा वाढ झाली, पण शिवसैनिक असाच असतो, गोरगरिबांना त्रास देणाऱ्यांना धडा शिकवणारच, असंही ते ठणकावून सांगतात. मतदारसंघात त्यांचा मोठा चाहतावर्गही आहे. (Hingoli MLA Santosh Bangar again in discussion)

श्रावण महिन्यात मतदारसंघातून औंढानागनाथपर्यंत काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेमुळे ते चांगलेच चर्चेत असतात. कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका आणि यात्रेत उघडपणे तलवार फिरवल्यामुळेही ते वादात सापडले आहेत. पण याची बांगर कधीही पर्वा करीत नाहीत. राज्यात शिवसेनेत बंड झाले तेव्हा, मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन मतदारसंघात परतलेल्या बांगर यांच्यावर शिवसैनिकांनी अक्षरशः फुलांचा वर्षाव करीत त्यांना डोक्यावर घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Santosh Bangar
Ayodhya Ram Mandir : कर्नाटक काँग्रेस सरकारचा रामभक्तांसाठी मोठा निर्णय; अयोध्येत उभारणार यात्री निवास

तेव्हा अगदी डोळ्यात अश्रू आणत संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंची साथ कधी सोडू नका, असे आवाहन शिवसैनिकांना केले होते. पण ढसाढसा रडणारे बांगर अचानक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले, याबद्दल त्यांच्या समर्थकांनीही तेव्हा आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, कानाखाली आवाज काढण्याची भाषा, वसतिगृहात जाऊन कर्मचाऱ्याला मारहाण करणे, असे प्रकार त्यांच्याबाबतीत अनेकदा घडले आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. पण तो ऐकतील ते बांगर कसले.

विरोधकांना आव्हान देणे आणि चर्चेत राहणे हा जणू त्यांना छंदच जडला आहे. पण या अतिउत्साहाच्या भरात दिलेली आव्हाने आणि ती पूर्ण न केल्यामुळे तोंडघशी पडण्याची वेळही संतोष बांगर यांच्यावर अनेकदा आली. आता विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर बांगर यांचा उत्साह जरा जास्तच वाढला आहे.

यातूनच त्यांनी 2024 मध्ये मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर मी जाहीर फाशी घेईन, असे चॅलेंज विरोधकांना दिले. यानिमित्ताने त्यांच्या आधीच्या आव्हानांची उजळणीही विरोधकांकडून केली जात आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात उडी मारण्याआधी केलेल्या रडारडीपासून बांगर यांच्या कोलांटउडीचा सिलसिला सुरू झाला, तो थांबायलाच तयार नाही.

MLA Santosh Bangar
Raver Loksabha : एकनाथ खडसेंच्या खासदारकीला काँग्रेसचा अपशकुन...

यापूर्वी कळमनुरी या आपल्याच मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सगळ्या जागा निवडून आणल्या नाही, तर मिशा काढीन, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले होते. झालं महाविकास आघाडीने या बाजार समितीत 12 जागा जिंकत बांगर यांच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. आता मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर जाहीर चौकात फाशी घेईन, असे आव्हान देत त्यांनी आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

MLA Santosh Bangar
Sangli Politics : अजितदादांचा जयंत पाटलांना सांगलीतच दे धक्का; अख्खी राष्ट्रवादी गळाला...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com