Rajesh Tope, Marathwada Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Water Crisis : दुष्काळात तेरावा महिना; राजेश टोपेंनी थेट मुद्द्यावरच बोट ठेवलं

Jagdish Pansare

Marathwada Political News : मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळामुळे येथील शेती, साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्याला राज्याच्या इतर भागापेक्षा निधीही कमी दिला जातो, अशी खंत माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

संभाजीनगर येथे आयोजित बैठकीत टोपे (Rajesh Tope) यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर नगर, नाशिकच्या लोकांनी पुन्हा हक्क सांगितल्याचे सांगत शेतकरी आणि साखर कारखानदारांनी या विरोधात एकत्र येण्याचे आवाहनही टोपे यांनी बैठकीत केले. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मराठवाडा जल अनुशेष व त्यावरील उपाययोजना करण्या बाबत चर्चा झाली.

मराठवाडा (Marathwada) नेहमीच दुष्काळी राहूनही इतर भागांच्या तुलनेत मराठवाड्याला कमी निधी दिला जातो. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे, मराठवाड्याच्या पाण्याचा बॅकलॉग कसा भरून काढावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, कोपरगाव येथील काही लोकांनी मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे पाण्यासंदर्भात याचिका दाखल करून मराठवाडा पाण्यावर हक्क मागण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठवाड्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी, साखर कारखानदारांनी एकत्रीत येणे गरजेचे आहे, असे आवाहनही टोपे यांनी केले. मराठवाड्याला हक्काच्या पाण्यासाठी कायम रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागतो, यापुढे हा प्रश्न कायमचा निकाली निघावा, अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली.

बैठकीला माजी आमदार कल्याण काळे, ए.डी. थोरात, भोंडे, जगताप, अनिल पाटील, खिल्लारे, डॉ. शंकरराव नागरे, रमाकांत पुलकुंडवार, प्रा. डॉ. राजाराम दमगीर, सर्जेराव वाघ, वडगावकर आदी पदाधिकाऱ्यांसह जलतज्ज्ञ उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT