Sandeep Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

Beed NCP News: आमदार क्षीरसागरांच्या सोबतीला आता शिलेदारांची फौज; पदाधिकाऱ्यांवर सोपवल्या नव्या जबाबदाऱ्या

Datta Deshmukh

Beed News: बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबतीला आता शिलेदारांची फौज असणार आहे. कारण राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड करत पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर जिल्ह्यातही कार्यकर्ते दोन गटांत विभागले गेले. काही कार्यकर्ते अजित पवार गटात, तर काही कार्यकर्ते शरद पवारांबरोबर आहेत, तर आता आगामी निवडणुका पाहता पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा कार्यकारिणीची निवड करत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. या नियुक्त्यामुळे पक्षाचे संघटन वाढवण्यास बळ मिळणार आहे.

संदीप क्षीरसागर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील चार आमदारांपैकी आमदार संदीप क्षीरसागर एकमेव शरद पवारांसोबत राहिले. अगोदरपासून विश्वासू असलेल्या संदीप क्षीरसागर यांना पवारांनी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले. प्रतिकूल राजकीय परिस्थितीतदेखील संदीप क्षीरसागरांनी शरद पवारांची 'स्वाभिमान' सभा बीडमध्ये यशस्वी करून दाखवली.

कोणावर कोणती जबाबदारी देण्यात आली ?

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर जिल्ह्यात कार्यकारिणीच्या निवडी बाकी होत्या. आता संदीप क्षीरसागरांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

जिल्हा उपाध्यक्षपदी सय्यद नवीदुज्जमा व झुंजार धांडे, तर जिल्हा सरचिटणीसपदी संजय थोरवे, बीड विधानसभा अध्यक्षपदी मदन जाधव, केज विधानसभा अध्यक्षपदी सुरेश पाटील, बीड तालुकाध्यक्षपदी राहुल गोरे, अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अमर देशमुख, बीड युवक तालुकाध्यक्षपदी दीपक हजारे, बीड शहराध्यक्षपदी खुर्शीद मोमीन, सामाजिक न्याय विभागाच्या बीड तालुकाध्यक्षपदी श्रीमंत सोनवणे, शहराध्यक्षपदी भारत कांबळे यांच्यासह सचिन दुधाळ, अनिल जवकर, पवन तांदळे, विनोद हातागळे, कपिल इनकर आदींच्या निवडी करण्यात आल्या.

दरम्यान, बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनात संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार सय्यद सलिम, प्रदेश सरचिटणीस प्रा. सुशीला मोराळे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींच्या हस्ते बीड, आष्टी, केज व अंबाजोगाईतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT