Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंनी करून दाखवलं! परळी मतदारसंघात साकारणार 'कृषी'च्या तीन संस्था

Beed- ParalI Political News : धनंजय मुंडेंच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली अन्...
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात अजित पवारांसह आमदारांचा एक मोठा गट शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी झाला. यात धनंजय मुंडे यांचादेखील समावेश होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री राहिलेल्या मुंडेंच्या गळ्यात 'महायुती' सरकारमध्ये थेट कृषी खातं पदरात पडलं. आणि आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे आले आहे.

याचदरम्यान, धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केलेल्या घोषणा पूर्णत्वाकडे जात आहेत. त्यांचे होमपीच परळी वैद्यनाथ तालुक्यात कृषी विभागामार्फत तीन शासकीय संस्था उभारणीच्या निर्णयास शुक्रवारी प्रशासकीय मान्यतेसह ३११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला.

Dhananjay Munde
Manoj Jarange Patil Rally : अंतरवाली सराटीच्या जरांगे पाटलांच्या सभेत घुमणार खेडच्या 'गुड्डू'चा आवाज !

सोयाबीन संशोधन, प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामास प्रशासकीय मान्यता आज देण्यात आली असून, या कामासाठी 24 कोटी 5 लाख इतका निधी खर्चास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. या अस्थापनेवर 15 पेक्षा अधिक पदांची नव्याने निर्मिती करण्यात येणार असून, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. (Parali News)

परळी वैद्यनाथ तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालय उभारणीच्या कामाच्या 154 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली असून, याद्वारे शासन स्तरावर सुमारे 100 पदांची निर्मिती होणार आहे. (Latest Marathi News)

त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील पहिले वहिले शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यासाठी सुमारे 132 कोटी 89 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, याद्वारे सुमारे 50 पदांची निर्मिती होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत जिल्ह्यासाठी या तीन संस्था मंजूर झाल्या होत्या.

बीड येथील कृषी भवन, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभागाच्या तीन शासकीय संस्था, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे वसतिगृहे, अशा अनेक विकासकामांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात यश मिळविले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Dhananjay Munde
Police Inspector Promotion: राज्यातील 104 पोलिस निरीक्षकांना दिवाळीआधीच मोठं 'गिफ्ट'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com