MLA Vilas Bhumre In Vidhan Bhavan News Sarkarnama
मराठवाडा

MLA Vilas Bhumre News : आमदार झाल्यावर साडेचार महिन्यांनी विलास भुमरे पहिल्यांदा सभागृहात!

MLA Vilas Bhumre attends the Legislative Assembly session after a gap of four months. : शेवटचे तीन दिवस प्रचाराला मतदारसंघात फिरू न शकलेले विलास भूमरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्ता गोर्डे यांचा त्यांनी 29 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.

Jagdish Pansare

Paithan Constituency : विधानसभेच्या पैठण मतदारसंघाचे शिवसेना आमदार विलास भुमरे आज साडेचार महिन्यांनी पहिल्यांदा विधीमंडळाच्या सभागृहात आले. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान त्यांना अपघात झाला होता. प्रचाराला शेवटचे तीन दिवस शिल्लक असतांना विलास भुमरे हे आपल्या घराच्या गच्चीतून भोवळ येऊन पडल्याने त्यांना हातापायाला फॅक्चर होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

शेवटचे तीन दिवस प्रचाराला मतदारसंघात फिरू न शकलेले विलास भूमरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. (Shivsena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्ता गोर्डे यांचा त्यांनी 29 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. परंतु घरातच झालेल्या अपघातात विलास भुमरे यांना गंभीर दुखापत झाल्याने ते गेल्या साडेचार महिन्यापासून उपचार घेत आहेत.

दरम्यान, त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रियाही झाल्या. डाॅक्टरांनी सक्त विश्रांती सांगितल्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देखील घेता आली नव्हती. (Paithan) 13 जानेवारी 2025 रोजी त्यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. आता प्रकृती बरी होऊन विलास भुमरे चालू-फिरू लागल्याने त्यांनी आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावली.

अजूनही चालण्यास त्रास होत असल्याने काठीचा आधार घेत विधान भवनात दाखल झालेल्या विलास भुमरे यांचे इतर सदस्यांनी स्वागत केले. तसेच प्रकृतीची चौकशीही केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना विलास भुमरे हे चक्कर येऊन कोसळले होते. पहाटे फोनवर बोलत असताना त्यांना चक्कर आली होती.

या अपघातात त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला चार ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. अगदी शेवटच्या क्षणी दुखापत झाल्याने विलास भुमरे यांना प्रचार थांबवावा लागला होता. पाच वेळा पैठण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT