Javed Rasul Driver MP Sandipan Bhumre News Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre News : दीडशे कोटींची जमीन गिफ्ट मिळालेल्या संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाचे बोलावणे!

Income Tax Department issues notice to MP Sandipan Bhumre's driver. : हिबानामाद्वारे संभाजीनगरमधील जालना रोडवर दाऊदपुरा येथील ही जमीन आहे. रेडी रेकनर दरानुसार कोट्यवधीची तीन एकर जमीन मिळाल्याबद्दल चालकाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वंशनाने दीडशे कोटीची जमीन गिफ्ट म्हणून दिल्याचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दीडशे कोटींची नाही तर पाचशे कोटींची जमीन गिफ्ट मिळाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आयकर विभागाने भुमरे यांच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावले आहे. या संदर्भात त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

खासदार संदीपान भुमरे, (Sandipan Bhumre) आमदार विलास भुमरे या पिता पुत्रांचा चालक असलेल्या जावेद रसूल याला सालारजंगच्या वंशजांनी दीडशे कोटीची संभाजीनगरमधील जमीन गिफ्ट दिल्याच्या प्रकार काही दिवसांपुर्वी समोर आला. त्यानंतर भुमरे-पिता पुत्रांनीच ही जमीन ड्रायव्हरच्या नावावर बळकावल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. मात्र आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे दोघांनीही स्पष्ट केले.

हिबानामा द्वारे संभाजीनगरमधील जालना रोडवर असलेल्या दाऊदपुरा येथील ही जमीन आहे. रेडी रेकनर दरानुसार कोट्यवधी किंमतीची तीन एकर जमीन मिळाल्याबद्दल चालकावर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. (Incom Tax Department) परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरन ती सुरू आहे. जावेद रसूल शेख याला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. जावेद शेख याला आयकर विभागाने नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले होते.

परंतु प्रकृती बरी नसल्याचे कारण देत रसूल याने चौकशीला जाणे टाळल्याचे बोलले जाते. 8 जुलै रोजी आयकर विभागाने जावेद रसूल याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तेव्हा चौकशी झाली की नाही? हे हे स्पष्ट नसले तरी त्याला आयकर विभागाने दुसर्‍यांदा चौकशीला बोलावत नोटीस बजावल्याची माहिती आहे. परंतु त्याने आपल्याला अजून वेळ द्यावा, अशी मागणी केल्याचे सुत्रांनी सांगितले.

या प्रकरणाशी खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचा संबंध असल्याचा थेट आरोप एमआयएमने केला आहे. पाचशे रुपयाच्या बाॅन्डवर पाचशे कोटीची आठ एकर जमीन त्यांच्या ड्रायव्हरला कशी मिळते? तत्कालीन मंत्री असल्यामुळे त्यांनी रात्री उशीरा राजकीय दबाव आणून हा व्यवहार करवून घेतला, असा आरोप करत याची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी इम्तियाय जलील यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT