Shivsena UBT MP sanjay jadhav sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav News : उद्धव ठाकरेंच्या खासदाराचे तळ्यात मळ्यात! म्हणाला, 'अजून पक्ष सोडला नाही, पुढचं...'

Sanjay Jadhav Shivsena UBT : खासदार संजय जाधव यांनी मोठं विधान केले आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंसोबत राहणार की जाणार या विषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : मी अजूनही शिवसेनेतच आहे, अजून पक्ष सोडलेला नाही. माझ्या मनात पक्षाबद्दल आजही आदर आहे, उद्याही राहील. पण भविष्यात पुढे काय होईल? हे सांगू शकत नाही, असे म्हणत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेवर भाष्य केले. त्यांच्या या भूमिकेमुळे ते सध्या दोन्ही डगरीवर पाय ठेवून असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मी नातेवाईकांकडे लग्न असल्यामुळे जाऊ शकलो नाही, पण त्यावरून माझ्याबद्दल उलट-सुलट चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या. पण त्याला मी काही करू शकत नाही. सध्याचे राजकारण बदलले आहे, समाजकारण मागे पडले असून अर्थकारणाला अधिक महत्व आले आहे.

आमच्या घरात सात मतदान आहे, याची आठवण जे कधीही पैसे घेत नव्हते असे लोक करून देतात, याचा अनुभव आम्ही निवडणुकीत घेतला, असल्याचे संजय जाधव यांनी सांगितले. राजकारण आता अर्थकारण होत चाललेले आहे, याचाही आता कुठेतरी विचार करावा लागेल. आज तरी मी शिवसेनेतच आहे, पुढचं काही सांगता येत नाही, असा सूचक इशाराही जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलतांना दिला.

...तर 2022 मध्येच गेलो असतो

गेल्या काही महिन्यापासून खासदार संजय जाधव हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशा चर्चा सुरू आहेत. माझे अनेक कार्यकर्ते मला म्हणतात, की आपण विरोधी पक्षात किती दिवस राहायचे, कधी तरी सत्तेत गेलं पाहिजे. 30-35 वर्षे झाली, तु्म्ही निर्णय घेत नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही. पण मी राजकारणात पैसा कमावण्यासाठी आलो नाही. समाजकारण करायचे म्हणून आलो, पैसा कमवायचा असता तर 2022 मध्येच गेलो असतो.

सगळ्यांना विचारून निर्णय घेईल

सध्या तरी मी शिवसेनेतच आहे, आता चर्चा सुरू असतात, त्याला काही करता येत नाही. जेव्हा निर्णय घ्यायचा, तेव्हा निश्चित सगळ्यांना विचारूनच घेईन, असेही संजय जाधव म्हणाले. त्यांच्या या भाषणानंतर पुन्हा जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडणार या चर्चेला बळ मिळाले. सोशल मिडियातून मात्र जाधव यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडली, तर पुन्हा खासदार होणे नाही, असा धोक्याचा इशाराही अनेक जण देताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT