Namdev Shastri On Dhananjay Munde .jpg Sarkarnama
मराठवाडा

Namdev Shastri News : संकटात सापडलेल्या धनुभाऊंच्या मदतीला भगवान गड..? झटक्यात वंजारी समाज राहिला मुंडेंच्या पाठिशी उभा; महंत गेम पलटवणार?

Bhagvan Gad On Dhananjay Munde News : महंत नामदेव शास्त्रींनी भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीमागे भक्कम उभा असल्याचं ठणकावत त्यांनी भाजप आणि अजित पवार यांना इशारा दिल्याचंही बोललं जात आहे. मुंडेंच्या मंत्रि‍पदाला धक्का लागल्यास वंजारी समाजाची नाराजी ओढावली जाईन अशी भीतीही भगवान गडाकडून व्यक्त करण्यात आली.

Deepak Kulkarni

Beed News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडे हे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि दोन कोटींची खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसोबतच्या कनेक्शनमुळे मुंडेंच्या सुसाट 'प्रगती एक्सप्रेस'ला चांगलाच ब्रेक लागला.विऱोधकांकडून एकापाठोपाठ होत असलेल्या गंभीर आरोपांनी संकटात सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) पाठीशी एका झटक्यात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी अख्खा वंजारी समाज उभा केला.

बीड सरपंच हत्याप्रकरणात बॅकफूटला गेलेल्या मंत्री धनंजय मुंडेंना भगवान गडाच्या पाठिंब्यामुळे मोठं पाठबळ मिळालं.देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडेंच्या विरोधकांनी राजकीय संधी साधली. त्यात भाजप आमदार सुरेश धस आणि स्वपक्षीय आमदार प्रकाश सोळंके,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे,आमदार जितेंद्र आव्हाड, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्वच राजकीय विरोधकांनी आघाडी उघडत मुंडेंना टार्गेट करण्यात येत आहे. एक ना दोन तर तब्बल 53 दिवसांपासून मुंडेंना घेरण्यासाठी अनेक गंभीर आरोपांचं जाळं टाकण्यात येत आहे. राजीनाम्यासाठीही मोठा दबाव टाकला जात आहे.

रोजच्या राजकीय नेत्यांच्या टीका,आरोप,दाव्यांनी घायाळ झालेल्या धनंजय मुंडेंनी अखेर भगवान गडाची वाट धरली.या भेटीत त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचं आणि गडाचे मुख्य महंत नामदेव शास्त्रींचंही (Namdev Shahstri) दर्शन घेतलं.त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शास्त्रींनी मुंडेंना गडाचा पाठिंबा जाहीर केला.तसेच त्यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलेच शिवाय ते गुन्हेगार नाही आहे,हे मी १०० टक्के सांगू शकतो असं सर्टिफिकेटही दिलं.

यावेळी महंतांनी भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीमागे भक्कम उभा असल्याचं ठणकावत त्यांनी भाजप आणि अजित पवार यांना इशारा दिल्याचंही बोललं जात आहे. मुंडेंच्या मंत्रि‍पदाला धक्का लागल्यास वंजारी समाजाची नाराजी ओढावली जाईन अशी भीतीही भगवान गडाकडून व्यक्त करण्यात आली.

नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या बाजूने कौल देण्याची ही पहिलीच वेळ नाही.याआधी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंना भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याला विरोध केला होता.यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. पण महंतांनी माघार घेतली नाही.पण त्यांच्या या विरोधामागे त्यावेळी पंकजा मुंडे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडेंच असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ज्यावेळी टोकाचा संघर्ष सुरु होता,त्यावेळीही नामदेव शास्त्रींनी गडाची ताकद धनुभाऊंच्या पारड्यात टाकली. त्यानंतर मुंडे बंधू-भगिनी वाद मिटवण्यातही त्यांचाच मोठा वाटा आहे. पण नामदेव शास्त्रींची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे. तसंच गडाचं साम्राज्य विस्तारण्यात त्यांचं मोठं योगदान आहे.पण आता याच शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे ते राजकीय नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

बीडचं पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच बीडचा दौरा केला.यावेळी त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना थेट इशारा देतानाच मंत्री धनंजय मुंडेंनाही अभय दिल्याची चर्चा आहे.कारण त्यांनी मुंडेंना सातत्यानं लक्ष करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना जिल्हा नियोजन समितीतून हटवत मोठा धक्का दिला. यामुळे निश्चितच मुंडेंविरोधातल्या आक्रमणाची धार कमी होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर त्याचदिवशी धनंजय मुंडेंनी भगवान गड गाठला.हा योगायोग नसून त्याच्यामागे मोठी राजकीय व्यूहरचना असण्याची राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.कारण इतके दिवस विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या गंभीर आरोपांनी घायाळ झालेले मुंडेंनी कधी संयमी,कधी बचावात्मक तर कधी आक्रमक भूमिका घेत आपली बाजू मांडली होती.

राष्ट्रवादीसह महायुतीतील नेत्यांनीही मुंडेंसाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलेलं नाही. त्याचमुळे कुठेतरी ते एकाकी पडल्याचं बोललं जात होतं. तसेच वंजारी समाज नेमका मुंडेंच्या पाठीशी आहे की नाही याचाही अंदाज त्यांना येत नव्हता. पण आता भगवान गडानेही पाठिंबा जाहीर केल्यानं धनंजय मुंडेंना मोठी ताकद मिळाली आहे. महंत नामदेव शास्त्रींनी गेम पलटवल्याची चर्चा आहे. त्यांनी सध्यातरी मुंडेंवरचं राजीनाम्याचं संकट दूर केल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT