Congress Leader Nana Patole News Sarkarnama
मराठवाडा

Nana Patole News : बीड, परभणी प्रकरण सरकार पुरस्कृत; सगळी माहिती असताना चौकशीचे नाटक कशाला!

Nana Patole says, Beed-Parbhani case sponsored by the government :काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संजय राऊत हा आमचा विषय कधीच नव्हता, असे म्हणत आपण त्यांना महत्व देत नसल्याचे म्हटले आहे. आपल्यासमोर देशाची सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसारखे प्रश्न आहेत.

Jagdish Pansare

मुंबई : बीड-परभणीतील प्रकरण हे सरकार पुरस्कृत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार सगळी माहिती घेऊन माध्यमांसमोर, विधानसभेत बोलत आहेत मग चौकशी, समिती ही नाटकं कशाला? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी तसेच गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले यांनी केला आहे. संजय राऊत हा आमचा विषय कधी राहिला नाही आणि राहणार देखील नाही, असेही पटोले म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून राज्यातील महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या घोषणेमुळे काँग्रेस आणि शिवसेनेमधील दरी वाढताना दिसत आहे. कोणाला मिरच्या लागण्याची गरज नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी सुनावल्यानंतर आता काँग्रेसचे नेतेही आक्रमक झाले आहेत.

राऊत आमचा विषय नाहीच..

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संजय राऊत हा आमचा विषय कधीच नव्हता, असे म्हणत आपण त्यांना महत्व देत नसल्याचे म्हटले आहे. आपल्यासमोर देशाची सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसारखे प्रश्न आहेत. बीड-परभणीचे प्रकरण हे सरकार पुरस्कृत आहे.सरकारजवळ सगळी माहिती असताना जनतेचे लक्ष मुळ प्रश्नांवरून भरकटवण्यासाठी आणि गुन्हेगारांना वाचविण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

सरकारमधील आमदारच माहिती घेऊन मीडियासमोर आणि विधानसभेत बोलत आहेत. सरकारकडे सगळी माहिती असतानाही एसआयटी,सीआयडी नेमण्याचा जो खेळ सरकार करत आहे, तो केवळ जनतेच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी सुरू आहे, याचा पुनरुच्चार नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो प्रयत्न या सरकारने चालवला आहे, तो थांबला पाहिजे. आरोपींवर तातडीने कारवाई आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

यापुढे महाराष्ट्रातच्या प्रतिमेला काळीमा फासणारी माणसं निर्माण होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. पण, सरकारने सगळा तमाशा करून ठेवलाय,असा संताप पटोले यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहि‍णींना पैसे देऊन मते घेण्याचे पाप महायुतीच्या सरकारने केले.आता त्याच बहिणींना लुटायचा प्रकार सरकार करते आहे. सत्ता आल्यावर 2100 रुपये देऊ, असे तुम्ही सांगितले होते,त्या प्रमाणे पैसे द्या, असे आवाहन देखील पटोले यांनी महायुती सरकारला केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT