Sharad Pawar- Sanjay Raut : मोठी राजकीय अपडेट! 'मविआ'ला बळ देण्यासाठी शरद पवार अन् संजय राऊतांनी उचललं मोठं पाऊल

Mahavikas Aaghadi : एकीकडे देशपातळीवरील इंडिया आघाडीला तडे जाण्याची चिन्हे आहेत. याचवेळी आता राज्यातील महाविकास आघाडीही फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण शरद पवार आणि संजय राऊतांच्या भेटीमुळे आघाडीत समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे.
Sanjay Raut and Sharad Pawar
Sanjay Raut and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेल्या महाविकास आघाडीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र अपयशाला सामोरे जावे लागले. या निराशाजनक कामगिरीनंतर मविआच्या नेतेमंडळींकडून पराभवाचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी एकमेकांना टार्गेट केले महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) असल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीची आजतागायत एकही बैठक झालेली नाही. एकीकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनीही (Sharad Pawar) यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला,हा आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात असतानाच आता मोठी घडामोड समोर आली आहे.

महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची महत्वपूर्ण भेट झाली. ही भेट महाविकास आघाडीच्या समन्वयाबाबत असल्याची चर्चा आहे.

Sanjay Raut and Sharad Pawar
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांची बाॅडी घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या गाडीचा तो 'यू-टर्न'; खासदार सोनवणे यांच्या शंकेनं खळबळ

खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट ही मुंबईतील सिल्वर ओक झाली.यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.महाविकास आघाडीतील समन्वय अभाव याविषयी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच उघड - उघड नाराची व्यक्त केली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई ते नागपूर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut and Sharad Pawar
Madhya Pradesh liquor ban : मोहन यादव सरकार मोठा निर्णय घेणार; मध्यप्रदेशात धार्मिक स्थळ असलेल्या शहरांमध्ये आता दारूबंदी!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हे आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो. विधानसभेला काही चुकीच्या गोष्टी घडल्याने महाविकास आघाडी पिछाडीवर गेली. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अद्याप घोषणा झालेली नाही. 21 जानेवारीला याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. त्यानंतर निवडणुकांबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याची टीका शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, या निवडणुकीतील अतिशय निराशाजनक कामगिरीनंतर आघाडीची आजतागायत चिंतन आणि मंथन करण्यासाठी बैठक झालेली नाही. तसेच निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांना टीकेची झोड ठेवण्यात येत आहे. महाविकास आघाडीची घडी पुन्हा बसली पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय वाढला पाहिजे, असं शरद पवार यांचं मत आहे. बैठकांसाठी शरद पवार आग्रही आहेत. पण नेत्यांचा पुढाकार नसल्याने मविआमध्ये नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Raut and Sharad Pawar
Santosh Deshmukh Case : 'सीएम'च्या सूचनेनंतर यंत्रणा हलली; मोठी अपडेट घेऊन तपास अधिकारी देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला जाणार

आगामी मुंबई पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाव्यतिरिक्त अद्यापही महाविकास आघाडीच्या इतर कोणत्याही घटक पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्ष मुंबई सोडली तर इतर ठिकाणी आघाडीत निवडणुका लढवण्यास उत्सुक नसल्याची चर्चा आहे.

एकीकडे देशपातळीवरील इंडिया आघाडीला तडे जाण्याची चिन्हे आहेत. याचवेळी आता राज्यातील महाविकास आघाडीही फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण शरद पवार आणि संजय राऊतांच्या भेटीमुळे आघाडीत समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. पण तरीही शरद पवारांची राष्ट्रवादी मविआतील शिवसेना आणि काँग्रेसच्या भूमिकेनंतरच आपला पत्ता ओपन करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत एकत्रित बैठक आणि चर्चा होत नसल्याने शरद पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com