Protest Against Manoj Jarange Patil News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : मुंडे समर्थकांच्या आंदोलनानंतर परळी पोलिसात जरांगे पाटील यांच्याविरोधात 'एनसी'दाखल

NC filed against Manoj Jarange Patil in Parli : मुंडे समर्थकांनी परळी शहर पोलिस स्टेशनसमोर जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आंदोलन केले. जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली.

Jagdish Pansare

प्रवीण फुटके

परळी : परभणी येथील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे थेट नाव घेत टीका केली होती. त्यांना राज्यात फिरू देणार नाही, अशा इशारा दिला होता. त्यानंतर आज परळी शहर पोलिस स्टेशनसमोर धनंजय मुंडे समर्थकांनी मनोज जरांगे पाटील हे जातीयवाद करत असून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आंदोलन केले होते.

तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला होता. अखेर संध्याकाळी परळी पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर 'एनसी' दाखल केली. तुकाराम बाबूराव आघाव यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. (Beed News) आघाव यांनी आपल्या तक्रारीत चार जानेवारी रोजी परभणीत मयत सोमनाथ सुर्यवंशी तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

त्या सभेत मराठा नेते मनोज जरांगे यांनी बोलताना ह्या मुंड्या फुंड्याचं नाव सुद्धा घेतले नाही. हरामखोर अवलादीचे असे व इतर बदनामीकारक असे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मा. धनंजय मुंडेसाहेबांबद्दल बदनामीकारक व असंवैधानिक वक्तव्ये केली. तसेच त्या भाषणाचे व्हिडिओ करून व्हायरल केले, म्हणून माझी मनोज जरांगे विरुद्ध तक्रार असल्याचे म्हटले आहे. यावरून पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एनसी दाखल केली आहे.

दरम्यान, आज धनंजय मुंडे समर्थकांनी परळी शहर पोलिस स्टेशनसमोर जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आंदोलन केले. जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करतानाच त्यांच्या धिक्कारांच्या घोषणाही दिल्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा आणि देशमुख कुटुंबाला न्याय द्या, या मागणीसाठी काल परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी केलेल्या भाषणात मनोज जरांगे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला. 'देशमुख कुटुंबियांच्या केसाला जरी धक्का लागल्यास, धनंजय मुंडे यांना रस्त्याने फिरू देणार नाही. इथं माणसांची मुडदे पडायला लागली आहेत. लेकरं उघडण्यावर पडायला लागलीत. आणि हे लोकं मारणाऱ्यांना घरात संभाळत आहेत',असा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता.

तसेच धमक्या देऊन हल्ले करणार असाल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, परभणी व धाराशिव जिल्ह्यातील आमचे माणसे घरात घुसून मारतील, अशी धमकी जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन दिली होती. जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये संताप पसरला होता. जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका धनंजय मुंडे समर्थक आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT