Maharashtra Assembly Election 2024 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणालाही बदलता येणार नाही अथवा आम्ही बदलू देणार नाही. काँग्रेसनेच अनेक वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न केला म्हणून काँग्रेसचा प्रचार म्हणजे उलट्या बोंबा याप्रमाणे आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत आम्ही केलेल्या विकास कामामुळे मतदारांना कन्व्हेन्स करता येत नाही म्हणून काँग्रेसने जनतेला कन्फ्युज केले, असा आरोपही गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला. देवणी येथे महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते.
व्यासपीठावर माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर डॉ. सुनील गायकवाड, आमदार शरणू सलगर, माजी आमदार गोविंद केंद्रे, प्रकाश खंड्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरज चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, अरविंद पाटील निलंगेकर यासह आदीची यावेळी उपस्थित होती. (Smabhaji Patil Nilangekar) काँग्रेस पक्षानेच भारतीय संविधानाचा बोजवारा उडवला असून अनेक वेळा घटना बदलण्याचे काम केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पिठाने घटनेच्या मूलतत्त्वाला कोणीही हात लावू शकत नाही, असा निर्णय दिला आहे, त्यामुळे घटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय काँग्रेसने चुकीची जी धोरणे स्वीकारली ते धोरण स्वीकारल्यामुळेच साठ वर्षात काँग्रेसने काय विकास केला हे जनतेसमोर असून आम्ही दहा वर्षात काय विकास केला हे पण जनतेसमोर आहे. त्यामुळेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.
भारत हा जगातील तिसरा शक्तिशाली आर्थिक देश बनणार असून येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा आमचा नारा आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात संपूर्ण भारतभर रस्त्यांचे जाळे पसरले आहे. येत्या काळात सुद्धा उर्वरित रस्ते आणि महामार्गांची कामे कामे केली जाणार आहेत.
देशातला शेतकरी अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता, इंधन दाता झाला पाहिजे, हे धोरण भारतीय जनता पार्टीचे आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे निलंगा विधानसभा मतदारसंघात एक दमदार आमदार म्हणून महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, उत्तम कार्यकर्ता, मराठवाड्यातील नेतृत्व म्हणून पूर्ण ताकतीने संभाजीराव यांच्या पाठीशी उभे, राहा असे आवाहन गडकरी यांनी केले. मी त्यांना मंत्री केल्या शिवाय स्वस्त बसणार नाही. त्यांनी मागणी केलेल्या मतदार संघातील सर्व कामांना मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी उपस्थितांना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.